Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईगेवराई तहसीलवर शेतकर्‍यांचा आक्रोश मोर्चा

गेवराई तहसीलवर शेतकर्‍यांचा आक्रोश मोर्चा


शेतकरी संघटनेने राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढलीशेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या
2021 चे पीक कर्ज माफ करा
गेवराई (रिपोर्टर)- अतिरिक्त पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकारने शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी यासह इतर मागण्यांसांठी आज शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा दसरा मैदानापासून निघाला होता. या मोर्चामध्ये तालुकाभरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

20 दिवसांपूर्वी पडलेल्या अतिरिक्त पावसामुळे बीड जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्य सरकारने अद्यापपर्यंतही नुकसान भरपाई घोषीत केली नाही. शासनाने शेतकर्‍यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी, 2020 चा पीक विमा देण्यात यावा, 2021 साली ज्या शेतकर्‍यांना पीक कर्ज दिलेले आहे त्या शेतकर्‍यांचे पीक कर्ज माफ करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने गेवराईच्या तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात यावा. सदरील हा मोर्चा रघुनाथ दादा पाटील, कालीदास आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे रामेश्वर गाढे यांनी काढला होता. या वेळी अशोक हातवटे, दिगांबर लोणकर, जे.डी. शहा, रामप्रसाद गाढे, शिवाजी राठोड, श्रीकृष्ण वेताळ, चंद्रकांत हातवटे, अशोक गाढे, रामप्रसाद गिरे, चंद्रकांत घोलप यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या वेळी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. शासनाचा निषेध म्हणून शासनाचा निषेध म्हणून राज्य सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली. या वेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले.

Most Popular

error: Content is protected !!