Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईमविष प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

विष प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू


गेवराई (रिपोर्टर)- एका 24 वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी त्याचा मृत्यू झाला.
दिलीप भगवान भोसले (वय 23, रा. बंगाली पिंपळा ता. गेवराई) असे विष पिलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. नातेवाईकांनी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याने विष का प्राशन केले हे मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Most Popular

error: Content is protected !!