Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडपीक कर्जासाठी शेतकर्‍यांचे दोन दिवसांपासून आमरण उपोषण

पीक कर्जासाठी शेतकर्‍यांचे दोन दिवसांपासून आमरण उपोषण


बीड (रिपोर्टर)- गेवराई तालुक्यातील उमापूर येथील स्टेट बँकेने शेतकर्‍यांना पीक कर्ज देण्यास नकार दिला असून या बँकेच्या निषेधार्थ शेतकरी गेल्या दोन दिवसांपासून बँकेसमोर उपोषणाला बसले आहेत. बँक प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.


राज्य सरकारने दोन वर्षापूर्वी कर्जमाफीची घोषणा केली मात्र या कर्जमाफीमध्ये अनेक शेतकर्‍यांचा समावेश झालेला नाही. उमापूर शाखेतील कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. त्यांना बँकेने पीक कर्जही दिलेले नाही. निष्क्रीय बँक प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी येथील काही शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलरे आहेत. या वेळी मनोज शेंबडे, अशोक आमटे, भूषण कदम, कैलास ढोले, आनंद आहेर, लक्ष्मण आहेर यांच्यासह आदींची उपस्थिती आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!