Sunday, January 23, 2022
No menu items!
HomeUncategorizedलखीमपूर खेरी प्रकरणी काँग्रेस आक्रमक थेट राष्ट्रपतींना भेटून केली गृहमंत्र्याच्या बडतर्फीची मागणी

लखीमपूर खेरी प्रकरणी काँग्रेस आक्रमक थेट राष्ट्रपतींना भेटून केली गृहमंत्र्याच्या बडतर्फीची मागणी


नवी दिल्ली (वृत्तसेवा)- काही दिवसांपूर्वी लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने काही शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घातल्याचं प्रकरण आता राष्ट्रीय पातळीवर तापू लागलं आहे. या घटनेमध्ये काही शेतकर्‍यांचा मृत्यू देखील झाल्यामुळे यासंदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांकडून आणि विरोधी पक्षांकडून केली जात आहे. यासंदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी, तसेच प्रियांका गांधी आणि काही शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसकडून राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनी राष्ट्रपतींकडे थेट केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधींनी केंद्र सरकारवर परखड शब्दांत टीका केली. लखीमपूर खेरीमध्ये ज्या शेतकर्‍यांचा मृत्यू झाला, त्यांच्या घरी आम्ही काही दिवसांपूर्वी गेलो होतो. त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना न्याय हवा आहे. ज्यानं ही हत्या केली आहे, त्याला शिक्षा व्हावी. त्यांनी हे देखील सांगितलं की ज्या व्यक्तीने हत्या केली, त्याचे वडील देशाचे गृहमंत्री आहेत. म्हणून जेव्हापर्यंत त्या व्यक्ती मंत्री आहेत, तोपर्यंत योग्य तपास आणि न्याय मिळू शकणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

Most Popular

error: Content is protected !!