Home बीड डीवायएसपींनी गुटख्याचे दोन ट्रक पकडले

डीवायएसपींनी गुटख्याचे दोन ट्रक पकडले


मांजरसुंब्याजवळील कारवाई; लाखो रुपयांचा गुटखा जप्त
नेकनूर (रिपोर्टर)- कर्नाटकहून बीडकडे दोन ट्रकमध्ये गुटखा येत असल्याची माहिती डीवायएसपी पंकजकुमार यांना झाल्यानंतर त्यांनी या दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या. या गाड्यांमध्ये लाखो रुपयांचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


दुपारी मांजरसुंबा मार्गावरून गुटख्याने भरलेल्या दोन ट्रक जात होत्या. या दोन्ही गाड्या डीवायएसपी पंकजकुमार, नेकनूर ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेख मुस्तफा, दीपक खांडेकर, सय्यद अब्दुल, मनोहर अनवणे, राऊत यांनी ताब्यात घेतल्या. या दोन्ही गाड्यात लाखो रुपयांचा गुटखा होता. या गाड्या कर्नाटकहून बीडकडे येत होत्या. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरील गुटखा कोणाचा आहे याची माहिती उपलब्ध झालेली नव्हती.

error: Content is protected !!
Exit mobile version