Home बीड तत्कालीन उपजिल्हाधिकारी शेळकेंच्या अडचणी वाढल्या शेळकेंच्या भ्रष्टाचाराच्या पुराव्याचे गाठोडे घेऊन नायब तहसीलदार...

तत्कालीन उपजिल्हाधिकारी शेळकेंच्या अडचणी वाढल्या शेळकेंच्या भ्रष्टाचाराच्या पुराव्याचे गाठोडे घेऊन नायब तहसीलदार बीडच्या कोर्टात

बीड (रिपोर्टर)- तत्कालीन उपजिल्हाधिकारी शेळके यांनी बीड जिल्ह्यातील शेकडो देवस्थानाच्या जमीनीत अफरातफर केली. देवस्थानाच्या जमीनी धनदांडग्यांच्या घशात घातली. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी शेळके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शेळके यांनी बीडमध्येच नव्हे तर औरंगाबाद, जालना जिल्ह्यातही जमीनीत मोठा भ्रष्टाचार केला. शेळके यास जामीन मिळू नये म्हणून भोकरदनचे तत्कालीन नायब तहसीलदार घोडके हे पुराव्याचे गाठोडे घेऊन बीडच्या कोर्टात आलेले आहेत.


बीड जिल्ह्यामध्ये देवस्थानाची शेकडो एक्कर जमीन आहे. या जमीनीची बोगस खरेदी-विक्री जिल्हाधिकारी कार्यालयातील भ्रष्ट अधिकार्‍यांच्या सहमतीने झाली. सदरील हा बोगसपणा गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आष्टी येथील काही लोकांविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर तत्कालीन उपजिल्हाधिकारी शेळके यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. त्यांना न्यायालयाने कोठडी सुनावली. शेळके हे काही महिने बीड येथे होते. या काळात त्यांनी काही भू माफियांच्या माध्यमातून जमीनीची अफरातफर केली आणि मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन धनदांडग्यांच्या घशात जमीन टाकली. शेळके यांनी फक्त बीडमध्येच जमीनीच्या प्रकरणामध्ये अपहार केला नाही तर औरंगाबाद, जालना येथेही शेकडो एकर जमीन त्यांनी माफियांच्या घशात घातली. शेळके यास जामीन मिळू नये, त्याची आणखी चौकशी व्हावी यासाठी भोकरदनचे तत्कालीन नायब तहसीलदार अनिल घोडके यांनी पुराव्याचं गाठोडं घेऊन बीड शहरात ते आले असून ते हे सर्व पुरावे बीडच्या कोर्टात दाखल करणार आहेत. घोडके म्हणाले की, शेळके यास राजकीय आणि बड्या अधिकार्‍यांचा आशीर्वाद असल्याने त्याच्यावर आतापर्यंत कारवाई झालेली नाही. त्यांच्या या अपहाराची सखोल चौकशी होऊन कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी घोडके यांनी केली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version