Monday, January 24, 2022
No menu items!
Homeक्राईमदुचाकी चोरांचा सुळसुळाट जिल्ह्यातून पाच दुचाकी लंपास

दुचाकी चोरांचा सुळसुळाट जिल्ह्यातून पाच दुचाकी लंपास

बीड (रिपोर्टर):- बीड जिल्हा पोलीसांचा चोरट्यांवर धाकच राहिला नाही. पोलीसांच्या नाका टिच्चून गुन्हेगार सर्रासपणे गुन्हे करतात अन् उघड्या छाताडाने फिरतात. याकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याने गुन्हेगारांचे फोफावत आहेत. काल बीड जिल्ह्यातून पाच दुचाकी लंपास झाल्याच्या त्या-त्या पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत. रोज 4-5 दुचाकी जिल्ह्यातून चोरीला जातात. मात्र पोलीसांना दुचाकी चोर सापडत नाही हे विशेष.

नेकनूर येथील मनोहर सिंग इंदरसिंग राजपुरोहित यांनी नेकनूर पोलीसात तक्रार दिली असून त्यांची दुचाकी क्र.एम.एच.44 पी 7448 व एम.एच.23 के. 497 या दोन दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. या प्रकरणी त्यांनी तक्रार दिली. पेठ बीड भागातून उज्ज्वल उगमचंद कोटेचा यांनी वैष्णव पॅलेस समोर लावलेली दुचाकी क्र.एम.एच. 23 एस 2900 ही अज्ञात चारेट्याने चोरून नेली. तिसरी घटना गेवराई येथे घडली असून सोमनाथ आहेलाजी ढवारे रा.बेलगाव या शेतकर्‍याने गेवराई शहरातील नवीन बसस्थानकासमोर लावलेली दुचाकी क्र.एम.एच.23 जे 0093 ही अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी त्यांनी गेवराई ठाण्यात तक्रार केली तर चौथी घटना आष्टी येथील असून अमोल भाऊसाहेब पोकळे रा.बेलगाव यांनी त्यांची दुचाकी क्र.एम.एच.23 ए.झेड. 0615 हॉटेल आरव काकड्याची किन्ही येथे लावली असता ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी त्यांनी आष्टी पोलीसात तक्रार दिली. भुरट्या चोरट्यांसह खून, दरोडे, बलात्कार, लुटमारीच्या घटना भर दिवसा घडत आहे.

Most Popular

error: Content is protected !!