Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडआरटीओ कार्यालयात अधिकारी,कर्मचार्‍यांची मनमानी सुरूच

आरटीओ कार्यालयात अधिकारी,कर्मचार्‍यांची मनमानी सुरूच


आरटीओ चव्हाण सुट्टी टाकून गेले,क्लर्क बांगर बेपत्ता; वाहन धारकांची परेशानी
बीड (रिपोर्टर):- आरटीओ कार्यालयातील अनागोंदी कारभार थांबता थांबेना. आरटीओ चव्हाण तीन दिवसाची रजा टाकून गेल्याने कर्मचारी कार्यालयात थांबायला तयार नाहीत. महत्त्वाची जबाबदारी असणारे क्लर्क बांगर हे बेपत्ता असल्याने वाहन धारकांची कामे खोळंबून पडली. वाहन धारक आपल्या कामासाठी कार्यालयात येतात मात्र कार्यालयात जबाबदार अधिकारी हजर नसल्याने त्यांना आल्या पावली परत जावे लागते.


आरटीओ जयंत चव्हाण हे तीन दिवसाची सुट्टी टाकून गेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ क्लर्क बांगर हेही तीन दिवसापासून कार्यालयात आलेले नाहीत. जबाबदार अधिकारी हजर नसल्याने आरटीओ कार्यालयातील कामे पुर्णत: खोळंबून पडली. दसर्‍याच्या पुर्वसंध्येला ऊसतोड मजुर ऊसतोडणीसाठी जातात. मजुरांना घेवून जाणारे वाहने आरटीओ कार्यालयात पासींग होत असतात मात्र कार्यालयात कर्मचारी नसल्याने वाहन धारकांची कामे खोळंबून पडलेली आहे. नंबर देणे, परमीट सिव्हील करणे ही कामे सध्या बंद आहेत. एखाद्या वाहनाचा अपघात झाला आणि त्याची पासिंग नसेल तर त्याची जबाबदारी आरटीओ कार्यालय घेणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान आरटीओ कार्यालयातील अनागोंदी कारभाराबाबत वरिष्ठ अधिकारीही दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. वाहन धारकांना होत असलेला त्रास पाहता आरटीओ कार्यालयाच्या विरोधात प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!