Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडसोयाबीनच्या ढिगार्‍याला आग लावली

सोयाबीनच्या ढिगार्‍याला आग लावली


बीड (रिपोर्टर):- शेतातील सोयाबीन काढुन तिचा ढीग करून ठेवला असता ती जाळून देवून दोन लाखाचे नुकसान केले. ही घटना परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे काल रात्री 12.30 वाजता घडली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

नाथ्रा अंतराम गुट्टे रा.धर्मापुरी या शेतकर्‍याने आपल्या शेतातील सोयाबीन काढून त्याचा ढीग शेतात ठेवला असता बालाजी विठ्ठल फड रा.धर्मापुरी याने तो जाळून टाकला. यामध्ये शेतकर्‍याचे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गुट्टे यांनी परळी ग्रामीण पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून फड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक धायजे हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!