Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडधारूरधारुर तहसील कार्यालय वार्‍यावर एकही अधिकारी हजर नसल्याने महिला संतप्त

धारुर तहसील कार्यालय वार्‍यावर एकही अधिकारी हजर नसल्याने महिला संतप्त

रिकाम्या खुर्च्यांचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल


किल्ले धारूर (रिपोर्टर):- धारूर तहसील कार्यालयाचा हलगर्जीपणा असलेला कारभार दिवसेंदिवस उघड होत आहे आज लाल बावटा महाराष्ट्र शेतमजूर युनियनच्या काही महिला कामानिमित्त तहसील कार्यालयामध्ये गेल्या होत्या त्या सकाळी दहा वाजल्यापासून ते 12:30 वाजेपर्यंत तहसील कार्यालयात थांबल्या परंतु एकही अधिकारी तहसीलदार किंवा नायब तहसीलदार नसल्याने या महिला चांगलेच संतप्त झाल्याचे दिसून आले.


धारुर तहसील कार्यालयातील कर्मचारी अधिकारी वेळेवर येत नसल्याने अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे अधिकारीच वेळेवर येत नसतील तर तहसील कार्यालयाचा कारभार कसा चालणार हे मात्र समजण्यास आपल्याला काही वेळ लागणार नाही. धारुर तहसील कार्यालयाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचे दिसून येत आहे अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नसल्याने कामानिमित्त ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे कसेबसे साडे बाराच्या नंतर अधिकारी कार्यालयात येतात लागलीच 1 वाजता नंतर जेवण करण्यासाठी जातात ते लवकर पुन्हा येतच नाहीत म्हणजेच धारूर तहसील कार्यालयाचा कारभार ढिसाळ कारभार होत असून जिल्हाधिकारी यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. आज शेतमजूर युनियनच्या महिलांनी अक्षरशः रिकाम्या खुर्चीचे फोटो काढून सोशल मीडियातून व्हायरल केले आहेत यामुळे धारुर शहरात तहसील कार्यालयाच्या कारभाराबाबत अधिकच चर्चा होत असून तालुक्यातील महत्त्वाचे असलेले हे कार्यालय बेवारस असल्याचे दिसून येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!