Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडपेन्शन मिळेना सेवानिवृत्त कर्मचार्‍याचा आत्मदहनाचा इशारा

पेन्शन मिळेना सेवानिवृत्त कर्मचार्‍याचा आत्मदहनाचा इशारा

दोन दिवसापूर्वीच पगार मिळत नसल्याने एका चालकाने केली आत्महत्या
बीड (रिपोर्टर):- एस महामंडळातून सेवानिवृत्त होवून चार वर्षाचा कालावधी लोटला तरी महामंडळ पेन्शन देत नसल्याने एका सेवानिवृत्त कर्मचार्‍याने आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. दोन दिवसापूर्वीच पगार होत नसल्याने आत्महत्या केली. एसटी महामंडळ कर्मचार्‍यांच्या मरणावर उतरलय की काय? अशा संतापजनक प्रतिक्रिया कर्मचार्‍यातून व्यक्त केल्या जात आहे.


बीड येथील एसटी महामंडळात शेख शब्बीर नजीर आहे चालक म्हणून कार्यरत होते. दि.31.12.2017 रोजी ते सेवातून निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर दुसर्‍या महिन्यापासून मासिक पेन्शन सुरू होणे आवश्यक असतांना एसटी महामंळाच्या गलथान कारभारामुळे गेल्या चार वर्षापासून शेख शब्बीर यांना पेन्शनपासून वंचित ठेवण्यात आले. याबाबत त्यांनी विभागीय कार्यालयातील अधिकारी बावीस्कर यांच्याकडे तक्रार केली. मात्र बावीस्कर हे त्यांच्याशी उद्दटपणाने वागले. तुम्हाला काय करायचे ते करा, आत्महत्या करा नाही तर आणखी काही करा अशा पद्धतीचे उत्तर या अधिकार्‍याने शेख शब्बीर यांना दिले. या प्रकरणी शेख शब्बीर आत्मदहन करण्या बाबतचा इशार परिवहन महामंडळाला दिला असून त्याचे निवेदन मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना पाठवले आहे. दोन दिवसापूर्वीच पगार न झाल्यामुळे तुकाराम सानप (वय 35 रा.अंकुश नगर) या चालकाने आत्महत्या केली आहे. एसटी महामंडळ कर्मचार्‍यांच्या जिवावर उठलय की काय? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. कर्मचार्‍यांच्या वेळेवर न होणार्‍या पगारी, पेन्शन धारकांचा छळ अशा पद्धतीचा अनागोंदी कारभार सध्या महामंडळामध्ये सुरू असल्याने महामंडळाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!