Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमपरळीत 3 अत्याधुनिक रिव्हॉल्व्हर व 8 जिवंत काडतुसे पकडली

परळीत 3 अत्याधुनिक रिव्हॉल्व्हर व 8 जिवंत काडतुसे पकडली

परळी शहर पोलिसांची मोठी कार्यवाही
परळी (रिपोर्टर)- परळी शहर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत आजवरची मोठी कार्यवाही केली आहे. मध्य प्रदेशातील एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकरवी देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर तीन अत्याधुनिक रिव्हॉल्व्हर आणि 8 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. रोहित राजेंद्र सोळंकी (वय -25) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मध्य प्रदेशातील तालुका सेंदवा, जि. बडवानी येथील तो रहिवाशी आहे.
   उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये, पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कार्यवाही गुन्हे शोध पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे, शंकर बुडडे, गोविंद भताने, मधुकर निर्मळ यांनी केली. ऐन विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मध्य प्रदेशातील एका एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर शोध घेत पोलिसांनी ही कार्यवाही केली. मराठवाड्यातील ही सर्वात मोठी कार्यवाही समजली जाते आहे. या घटनेतील आणखी धागेदोरे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत असून रात्री उशिरपर्यंतही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच असून वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात पोचले आहेत. परळी शहर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे, करण ऐन सनासुदिच्या दिवसांत पोलिसांवर कामाचा प्रचंड तणाव असतांना त्यांनी ही मोठी कामगिरी करून दाखवली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!