Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडमहाविकास आघाडीतील एकजुटीमुळे सतीश चव्हाणांचा दणदणीत विजय होणार -ना.अब्दुल सत्तार

महाविकास आघाडीतील एकजुटीमुळे सतीश चव्हाणांचा दणदणीत विजय होणार -ना.अब्दुल सत्तार


चव्हाणांचा ५० हजारापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होणार – माजी मंत्री खोतकर
बीड (रिपोर्टर)-महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आ.सतिश चव्हाण यांचा एकतर्फी आणि दणदणीत विजय होणार असून कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने पदवीधरांपर्यंत पोहचावे असे आवाहन महसुल राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी केले. तर सतीश चव्हाणांचा ५० हजारापेक्षा अधिक मताधिक्याने विजय होईल असा विश्वास माजी मंत्री खोतकर यांनी व्यक्त केला.महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ दि. २६ नोव्हेंबर वाजता शहरातील यशराज इन हॉटेलमध्ये झालेल्या तिन्ही पक्षांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी माजीमंत्री अर्जुनराव खोतकर, बदामराव पंडित, माजी आ.सिराज देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक यांची प्रमुख उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!