Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यातून कोरोना हद्दपार ! रविवारी जिल्ह्यात 8 पॉझिटिव्ह

जिल्ह्यातून कोरोना हद्दपार ! रविवारी जिल्ह्यात 8 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत बीड जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला होता. हजारो लोकांचा बळी घेणारा कोरोना आता बीड जिल्ह्यातून हद्दपार होत आहे. रविवारी आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात चार तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आले.
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या दोन महिन्यांपासून हळूहळू कमी होऊ लागली आहे. दुसर्‍या लाटेत प्रथमच बीड जिल्ह्याचा आकडा दहाच्या आत आला आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात एकूण 1 लाख 3 हजार 106 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर 2 हजार 792 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या बीड जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट 1.44 टक्के आहे. कालच्या तारखेनुसार बीड जिल्ह्यात 186 रुग्ण उपचार घेत आहेत. 1 लाख 128 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या अहवालात चार तालुक्यात 8 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आष्टी 3, बीड 2, केज 2 आणि शिरूर तालुक्यात 1 रुग्ण आढळून आला आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!