Monday, January 24, 2022
No menu items!
Homeराजकारणसरकार पाडण्यासाठी जोर दिला तर जनतेच्या कामासाठी उर्जा राहणार नाही -पंकजा मुंडे

सरकार पाडण्यासाठी जोर दिला तर जनतेच्या कामासाठी उर्जा राहणार नाही -पंकजा मुंडे


औरंगाबाद (रिपोर्टर) सरकार पाडण्यासाठी जोर दिला आणि त्याबद्दल कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत केले तर जनतेच्या कामासाठी त्यांच्याकडे उर्जाच राहणार नाही. सरकार किंवा विरोधी पक्ष हा जनतेसाठी काम करत असतो त्यामुळे सरकार राहतं की जातं हा विषय महत्वाचं नसून आपलं काम महत्वाचं असल्याचं पुनरुच्चार आज पुन्हा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला.

त्या दिल्लीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या बैठकीसाठी जात असताना विमानतळावर पत्रकारांशी संपर्क साधताना बोलत होत्या. या वेळी शरद पवार यांच्या वक्तव्या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या, ‘त्यांच्या बोलण्याने मी लहान होत नाही आणि मोठीही होणार नाही’, मी पवार साहेबांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण मोबाईलवर पाहिलं, त्यांनी जे बोललं ते खरं आहे, ‘मी मोठी नेता नाही, मी लहानच आहे, पण मोठ्या नेत्याने लहान नेत्याविषयी बोललं पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे पण तरीही त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर त्यामुळे मी लहानही होत नाही आणि मोठीही होणार नाही, मी आहे तीच राहणार, ते आमच्यापेक्षा मोठे नेते आहेत, असेही या वेळी पंकजा मुंडेंनी या वेळी म्हटले आणि राज्यातील सरकार पाडण्याच्या भाजपातीलच काही नेत्यांच्या वक्तव्याबाबत पुन्हा त्यांनी त्यांना घरचा आहेर देत सरकार राहतं की, जातं हा विषय महत्वाचा नसल्याचे सांगून आपलं काम महत्वाचा असल्याचे त्यांनी म्हटलं.

Most Popular

error: Content is protected !!