Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडपेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांना झटका पेट्रोलियम मंत्री म्हणाले, किंमत कमी होणार नाही

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांना झटका पेट्रोलियम मंत्री म्हणाले, किंमत कमी होणार नाही


नवी दिल्ली (रिपोर्टर)- देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. आज (रविवार) पुन्हा सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढवले आहेत. वाढत्या दरामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझलचे दर कधी कमी होणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र तेलाच्या किंमतीमध्ये कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले आहेत.
सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवल्यानंतर रविवारी दिल्लीत डिझेल आणि पेट्रोल या दोन्हीच्या किमतीत 35 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये लोकांना आता एक लिटर पेट्रोलसाठी 105.84 रुपये आणि डिझेलसाठी 94.57 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईतही इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईत एक लीटर पेट्रोल 111.77 रुपयांना आणि एक लिटर डिझेल 102.52 रुपयांना विकल्या जात आहे.

कमी-अधिक प्रमाणात चेन्नई आणि कोलकाता सारख्या महानगरांमध्ये देखील अशीच स्थिती आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे कोलकातामध्ये पेट्रोल 106.43 रुपये आणि डिझेल 97.68 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये डिझेल 98.92 रुपये आणि पेट्रोल 103.01 दराने विकले जात आहे.
दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पेट्रोल-डिझलच्या दरात कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे म्हटले आहे. शनिवारी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना हरदीप सिंह पुरी म्हणाले की, करोना येण्यापूर्वीच्या तुलनेत आज पेट्रोल आणि डिझेलचा वापर अनुक्रमे 10-15% आणि 6-10% वाढला आहे. मी किंमतीवर जाणार नाही. आम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहोत.

Most Popular

error: Content is protected !!