Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीड‘बेबी किट’मध्येही अपहार

‘बेबी किट’मध्येही अपहार


बीड (रिपोर्टर)- अंगणवाडी मार्फत लहान मुलांसाठी बेबी किटचे वाटप केले जाते. या किटमध्ये 17 वस्तू असतात. यातील पाच ते सहाच वस्तू संबंधित मातेला दिल्या जातात. इतर वस्तू काही अंगणवाडी ताई देत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. याबाबत काही मातांनी तक्रारी केल्या तर त्यांना उलटसुलट उत्तरे दिली जात आहेत.

बालविकास विभागाच्या वतीने ज्या मातेला पहिलं मुल जन्माला आलं त्या मुलास बेबी किट वाटप केली जाते. या बेबी किटमध्ये दोन ड्रेस, नेल कटर, साबण, शॅम्पू, डायफर यासह इतर एकूण 17 वस्तू असतात. यातील चार ते पाचच वस्तू संबंधित अंगणवाडीताई देते. इतर वस्तू ठेवून घेतात. बेबी किटमध्येही अपहार होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जाते. ज्या मातेस बेबी किट बाबतची माहिती असते त्या मातेने वस्तूबाबत अंगणवाडी ताईकडे प्रश्‍न विचारल्यास त्यांना गोल गोल उत्तरे देऊन वेळ निभावून नेली जाते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!