Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमगेवराईत चोरट्यांचा पांढर्‍या सोन्यावर डल्ला वेचलेला 6 क्विंटल कापूस चोरून नेला

गेवराईत चोरट्यांचा पांढर्‍या सोन्यावर डल्ला वेचलेला 6 क्विंटल कापूस चोरून नेला


गेवराई (रिपोर्टर)- पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतातून कसा बसा 10 रुपये किलोने वेचलेला कापूस शेडमध्ये ठेवला असता अज्ञात चोरट्याने तब्बल 6 क्विंटलपेक्षा जास्त कापूस चोरून नेल्याची घटना गेवराई येथे घडली. या प्रकरणी शेतकर्‍याने गेवराई पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गेवराई येथील नवनाथ राधाकिसन बोराडे यांनी आपल्या शेतामध्ये कापूस गेल्या तीन दिवसाच्या कालखंडात 10 रुपये किलोने मजूर लावून वेचला. आधीच पावसामुळे शेती उद्ध्वस्त झाली आहे. आजही शेतातले उभे पीक पाण्यात आहे. या परिस्थितीत थोडाथोडका आलेला कापूस वेचला गेला होता. 6 क्विंटलपेक्षा जास्त कापसाची वेचणी झाली होती. यावर्षी कापसाचे उत्पादन अल्प असल्याने सुरुवातीलाच कापसाचा बाजार भाव प्रतिक्विंटल साडेसहा हजारापेक्षा जास्त झाला आहे. गेल्या तीन वर्षात हा भाव जास्तीचा आल्याने शेतकरी हाती आलेल्या कापसातून दोन पैशे पदरी पडतील या अपेक्षेत असतानाच आता चोरट्याने पांढर्‍या सोन्याकडे कटाक्ष टाकले आहे. बोराडे यांच्या शेतातील सहा क्विंटलपेक्षा जास्त वेचलेला कापूस चोरून नेऊन चोरट्यांनी काम फत्ते केले. या प्रकरणी गेवराई पोलीसात नवनाथ बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Most Popular

error: Content is protected !!