Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडजिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर आंदोलनाने दणाणला

जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर आंदोलनाने दणाणला


जमिनी बळकावणार्‍यांविरोधात कारवाई करा, गायरानधारक शेतकर्‍यांसाठी डीपीआयचे धरणे, घरकुलासाठी पारधी समाजाचे आंदोलन, देवस्थान जमीनप्रकरणी आघाव पाटील यांना
निलंबीत करा, राज्यातील आठवडी बाजार सुरू न केल्यास तीव्र आंदोलन
बीड (रिपोर्टर)-राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई जाहीर केली, मात्र यात गायरानधारक शेतकर्‍यांचा उल्लेख नाही. गायरानधारक शेतकर्‍यांना शासनाची मदत देण्यात यावी या मागणीसाठी डीपीआयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गायरानधारक शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. जनावरांचा आठवडी बाजार सुरू करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र गुरे व्यापारी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे. तर इनामी जमीन प्रकरणी आघाव पाटील यांच्यावर निलंबणाची कारवाई करावी, या साठी आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. घरकुलासाठी एक पारधी कुटुंबियाचे आंदोलन सुरू आहे.

44


अतिरिक्त पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली, मात्र गायरानधारक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. गायरान धारक शेतकरी नाहीत का? असा प्रश्‍न उपस्थित करत त्यांना तात्काळ नुकसान भरपाई घोषीत करण्यात यावी या मागणीसाठी डीपीआयच्या वतीने अजिंक्य चांदणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे तर आम आदमी पार्टीच्या वतीनेही आंदोलन करण्यात आले. देवस्थानाच्या जमीनी प्रकरणी आघाव पाटील यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात यावी, बोगस झालेले खालसा तात्काळ रद्द करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी अशोक येडे, रामदास जमाले, सय्यद सादेक, बाळासाहेब घुमरे, ज्ञानेश्‍वर राऊत यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

245792659 416975446501177 2543334542386872822 n


राज्यामध्ये बाजार बंद असल्याने शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांचे नुकसान होऊ लागले आहे. बाजार तात्काळ सुरू करण्यात यावे यासाठीही आंदोलन सुरू आहे. या वेळी डॉ. संजय तांदळेंसह इतरांची उपस्थिती होती.

245804847 585722549242584 1912635482109044638 n


बीड जिल्ह्यातील इनामी धार्मिक स्थळावर दरोडे घालणार्‍या महसूल प्रशासनातील दरोडेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. सदरील हे आंदोलन गणेश ढवळे, तांदळे यांच्यासह आदींच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. वासनवाडी परिसरामध्ये राहणार्‍या पारधी समाजाच्या काळे कुटुंबियांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. त्यांना घरकुल देण्यात यावे यासाठी कुटुंबियांचे आंदोलन सुरू आहे. एकूणच या आंदोलनांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.

Most Popular

error: Content is protected !!