दागीने पळविले
दरोडेच्या तपासासाठी श्वान पथक
बीड (रिपोर्टर)ः- शेतामध्ये राहत असलेल्या माय लेकरास दरोडेखोरांनी गजासह काठीने मारहाण केली. मारहाणीनंतर दरोडेखोरांनी महीलेच्या गळ्यातील 5 ग्रॅमचे मंगळसुत्र नेले. जखमी मायलेकरास उपचारार्थ बीड शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.हि घटना पाहते अडीच वाजता तळेगांव शिवारात घडली. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर ग्रामीण पोलीसांसह जिल्हा पोलीस अधिक्षक ठाकूर चार वाजता घटनास्थळी दाखल झाले होते. दरोड्याच्या तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
अनिता चंद्रकांत गायकवाड वय-50 वर्षे, व संदेश चंद्रकांत गायकवाड वय-23 वर्षे हे माय लेकरं तळेगांव शिवारामध्ये शेतात राहतात. पाहते अडिच वाजता त्यांचा दरवाजा वाजवल्यानंतर त्यांनी दार उघडले असता तिन दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश करत अनिता गायकवाड सह संदेश गायकवाड या दोघांना काठी व गजाने मारहाण केली. एकुण पाच दरोडेखोर होते. त्यांच्या चहेर्यावर मास्क बांधलेले होते. दरोडेखोरांनी अनिता यांच्या घरातील पाच ग्रॅम सोन्याचे मनी मंगळसुत्र लुटून नेले. जखमी मायलेकरास उपचारासाठी बीड शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर स्वतःह जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर हे चार वाजता घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक लांजेवार, डिवायएसपी वाळके, ग्रामीण ठाण्याचे आवारे, साबळे, बडे सह आदि अधिकारी, कर्मचारी दाखल झाले होते. दरोडे खोरांच्या तपासासाठी श्वान, फिंगरप्रिंट पथक दाखल करण्यात आले होते.
अन् दरोडेखोरांनी दया दाखविली
जेव्हा गायकवाड यांच्या घरी दरोडेखोरांनी हल्ला केला तेव्हा त्यातील एक दरोडेखोर दुसर्या दरोडेखोराला अनिताला मारण्याचं सांगतो, तो दरोडेखोर चाकू घेऊन पोटावर वार करणार तेवढ्यात अनिता यांनी मला मारून काय भेटेल, मला मारू नका, असं म्हणत विनवणी करते तेव्हा दरोडेखोर त्यांच्यावर वार करत नाहीत. गळ्यातलं सोन्याचं मंगळसुत्र आणि अन्य दागिने ओरबाडतो. अनिताच्या विनवणीमुळे दरोडेखोरांनी दया दाखविली आणि त्यांचा जीव वाचवला.
अंकुश नगर मध्ये काही
घरावर दगडफेक
बीड शहरातील अंकुश नगर भागामध्ये रात्रीच्या दरम्यान काही घरावर दगडफेकीची घटना घडली. सदरील ही दगडफेक चोरट्यानी केली असल्याचे सांगण्यात येते. या घटनेची माहिती शिवाजी नगर पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांची घटनास्थळी गस्त घातली होती.