Friday, October 22, 2021
No menu items!
Homeक्राईमगेवराई बायपासवर भीषण अपघात ४ ठार, १ जखमी

गेवराई बायपासवर भीषण अपघात ४ ठार, १ जखमी


मृतांमध्ये लातूर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऍड. सदाशिव भिंगेंचा समावेश


बीड/गेवराई (रिपोर्टर)- लातूर येथून औरंगाबादकडे निघालेल्या कारने गेवराई बायपास जवळ समोरून येणार्‍या टँकरला कठडा तोडून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडल. अपघातात मरण पावलेल्यांमध्ये लातूर येथे बहुजन वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळीच तिघांनी जीव सोडला तर चौथ्याचा मृत्यू उपचारार्थ बीड येथे आणताना झाला.(Among the dead was Adv. of Sadashiv Bhingen in car accident)


याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे हे आपल्या नातेवाईकांसह कार (क्र. एम.एच. ४६ बी. ९७००) ने औरंगाबादकडे निघाले होते. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भिंगे यांची गाडी गेवराई बायपास जवळ आली असता गाडीचा वेग जास्त असल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला अन् गाडी राज्य महामार्गावरील कठडा तोडून समोरून येणार्‍या टँकरवर जावून धडकली. गाडीचा वेग मोठा असल्याने गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला तर गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांपैकी तिघा जणांचा मृत्यू जागेवर झाला. दोघांना बीड येथील रुग्णालयात आणले जात असताना त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला.

या अपघातात मरण पावलेल्यांमध्ये लातूर येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऍड. सदाशिव भिंगे, संतोष भिंगे सुभाष भिंगे, महादेव सकटे (सर्व रा. कामखेडा ता.रेणापूर जि. लातूर) यांचा समावेश आहे तर राम भिंगे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य महामार्गावर अपघात झाल्यामुळे या भागातील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती कळताच महामार्ग पोलिसांसह घटनास्थळी गेवराई पोलिस डेरेदाखल झाली.

Most Popular

error: Content is protected !!