Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडव्यक्तिकेंद्रित पक्षाचं भाजपात संवर्धन खतगावकरांचा पक्षत्याग, पंकजांचे खडेबोल जानकारांच्या फटकेबाजीत मराठवाड्यातलं सत्य...

व्यक्तिकेंद्रित पक्षाचं भाजपात संवर्धन खतगावकरांचा पक्षत्याग, पंकजांचे खडेबोल जानकारांच्या फटकेबाजीत मराठवाड्यातलं सत्य दिसतं

गणेश सावंत । बीड
हुकुमशाही राजकारणाचा आणि सत्ताकारणाचा अट्टाहास ठेवून राजकारभार करणार्‍या दिल्ली तक्त भाजपाच्या नेतृत्वाचे वाण आणि गुण त्यांच्याच पक्षात सर्वदूर पसरताना दिसू लागले असून त्याचा फटका भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत गटबाजीतून मराठवाड्यात खासकरून पहावयास मिळत आहे. फडवणीस हित रक्षणाय चिखलीकरांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून नांदेडमधील खतगावकरांची घरवापसी बीडमधून पंकजा मुंडेंचे स्वकियांना खडेबोल तर ओबीसीवरून महादेव जानकरांची तुफान फटकेबाजी भाजपाच्या अंतर्गत गटबाजीचा बुरखा फाडणारी ठरली आहे.

महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी दिल्ली तक्तासारखीच हुकुमशाही आणि व्यक्तिकेंद्रित होताना जशी भाजपाच्याच पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांना दिसू लागली तसे मराठवाड्यातही व्यक्तिकेंद्रित राजकारणाला सुरुवात झाली. विधानसभेची निवडणूक असो वा स्थानक स्वराज्य संस्थेची निवडणूक भाजपातील नेते असोत अथवा मित्र पक्षांचे नेते असोत यांच्यातील अंतर्गत धुसफूस मराठवाड्यामध्ये सातत्याने पहावयास मिळते. राज्याच्या राजकारणात बीड जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्व सातत्याने प्राप्त होते. इथेच राजकारणातला सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टीकोनाचा मार्ग अथवा उगम होतो. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडामध्ये बीड भाजपात आणि राज्य भाजपात सुरू असेली धुसफूस ही माजी मुख्यमंत्री विरुद्ध जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशी सातत्याने पहावयास मिळाली. माजी मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी मित्र पक्ष आणि स्वकिय तर लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्याच्या पाठिशी समाज, ओबीसी आणि मित्र पक्षातील व्यक्तीकेंद्रित व्यक्ती दिसून येतो. या आठवड्यात मराठवाड्यात भाजपाच्या अंतर्गत गटबाजीच्या घडामोडी पाहता भाजप हा गल्ली ते दिल्ली व्यक्तीकेेंद्रित होताना दिसून येतो. काँग्रेसमधून भाजपात डेरेदाखल झालेले नांदेडचे माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी नुकतीच घरवापसी केली ती केवळ विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकरांच्या एकाधिकारशाहीमुळे आणि त्या एकाधिकारशाहीला फडणवीसांकडून मिळणार्‍या रसदीमुळे नांदेडमध्ये भाजपाला हा एक जबरदस्त फटका मानला जातो. प्रतापराव चिखलीकर यांचे आणि फडणवीसांचे संबंध एकदिलाचे. त्यामुळेच खतगावकरांचं याठिकाणी चाललं नाही व देगलूर, बिलोली मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत साबणे यांना उमेदवारी दिली. हे कारण खतगावकरांना बाहेर पडण्यासाठी पुरेसा ठरला. तर बीडमध्ये दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी ओबीसींच्या साक्षीने भाजपाच्याच नेत्यांना खडेबोल सुनावले. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य नेते राज्यातलं महाविकास आघाडी सरकार आज पडणार, उद्या पडणार, असा वावड्या उठवतात. भाजपाच्या आमदारांना सरकार पडण्याचे आणि सत्तेत येण्याचे स्वप्न दाखवतात. आता हे बस्स करा, सरकार पडणार की नाही यापेक्षा जनतेच्या कामाला महत्व द्या, म्हणत पंकजांनी भाजपाला घरचा आहेर दिला. यावर बोलण्याची तसदीही देवेंद्र फडणवीसांनी घेतली नाही. पत्रकारांनी यावर विचारले असता ते पत्रकार परिषदेतून उठून गेले. यातून भाजपाची अंतर्गत खदखद दिसून येते. याच ओबीसीच्या मेळाव्यात मित्र पक्ष असलेल्या जानकारांनी भाजपाच्या एकाधिकारशाही नेतृत्वाला चांगलेच चिमटे दिले. आमच्यासारख्यांना सातत्याने पशुसंवर्धनाचं खातं दिलं जातं, असं म्हणत ‘छूत-अछूत’ची आठवण करून दिली. पक्षापेक्षा ओबीसी मोठी असल्याची आठवण नव्हे, धमकी नव्हे थेट चेतावणीच जानकारांनी दिली. जानकारांची फटकेबाजी ही व्यक्तीकेंद्रित भाजपाला दिर्घकाळ बोचणारी राहणार. नांदेड, बीडमध्ये जे चालू आहे तेच औरंगाबाद, परभणी, जालन्यात आणि उस्मानाबादमध्येही पहावयास मिळते. जो तो मोदी-शहांची नक्कल करून आपणच भाजपाचं सर्वस्व असल्याचं जिल्ह्या जिल्ह्यात दाखवतो. बीडमध्येही पंकजा मुंडे म्हणजेच भाजप हे दाखवण्यात येत असताना भाजपाचे काही आमदार धूसफुसीत दिसतात. मग तिथे गेवराई असो या आष्टी, पाटोदा इथेही धुसफूस पहायला मिळते. या सर्व घटनाक्रमावरूएन व्यक्तीकेंद्रित पक्षाचं भाजप सवंर्धन करतय असच दिसून येतं.

व्यक्तिकेंद्रित पक्षाचं
भाजपात संवर्धन

खतगावकरांचा पक्षत्याग, पंकजांचे खडेबोल
जानकारांच्या फटकेबाजीत मराठवाड्यातलं सत्य दिसतं

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!