Tuesday, January 25, 2022
No menu items!
HomeUncategorizedमहागाई व दरवाढीच्या विरोधात केंद्र शासनाचा निषेध करत धारुर शहरातून राष्ट्रवादी युवक...

महागाई व दरवाढीच्या विरोधात केंद्र शासनाचा निषेध करत धारुर शहरातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने काढली रॅली


किल्ले धारूर (रिपोर्टर):- वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक परेशान झाले आहेत या महागाई वाढण्याला केंद्र शासन जबाबदार असून याबाबत केंद्र शासनाच्या विरोधात केंद्र शासनाचा निषेध करत धारूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीने निषेध करत आज रॅली काढली आहे.

दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेल त्याचबरोबर खाद्यतेल, घरगुती गॅस त्यातच आता भाजीपाल्याचे किमतीही वाढले असल्याने याचा निषेध आज राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी धारूर यांच्यावतीने करण्यात आला धारूर येथील आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक रॅली काढून केंद्र शासनाचा जाहीर निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस बीड जिल्हा सरचिटणीस भागवत दराडे ,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय गुळवे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल जगताप, माजी युवक तालुकाध्यक्ष सटवा अंडील , रतन शेंडगे ,युवक शहराध्यक्ष नितीन शिनगारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वाढलेली महागाई केंद्रशासनाने कमी करावी परंतु केंद्र शासन याबाबत डोळेझाक करत असल्याने आज सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे अवघड झाले असल्याचे दिसून येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!