Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडवडवणीमोदी सरकारच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवकचा निषेध मोर्चा

मोदी सरकारच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवकचा निषेध मोर्चा

वडवणी (रिपोर्टर):- पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढी विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने वडवणी तहसिलवर निषेध रँली काढून मोर्चा काढण्यात आला असून यामध्ये केंद्रातील भाजपा मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या आहेत.

सदरील मोर्चा राष्ट्रवादी युवक चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी अकरा वाजता वडवणी शहरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भोलेनाथ लंगे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.यावेळी रा.कॉ. जिल्हा सारचटणीस दिनेश मस्के, ता.अ. बजरंग साबळे , सतिष बडे(नगरसेवक)अंगद घुगे,भास्कर उजगरे,गणेश शिंदे,सुग्रीव मुंडे,सतीश खोटे,रमेश मुंडे,शाहदेव शेंडगे,प्रज्वल उजगरे,विकास आडे,अक्षय गोंडे,जय मुंडे,समीर अत्तार, बी.टी. डोंगरे,राहुल चिंचकर,तुकाराम लांडे,ऋषी खोटे,महादेव लंगे,पारस लंगे,शंकर जाधव,मुकुंद गोंडे,बबलू गोंडे,यासह तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर दरवाढी चे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!