Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडग्रामपंचायतच्या जागेवरील अतिक्रमण हटवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकर्‍यांचे आमरण उपोषण

ग्रामपंचायतच्या जागेवरील अतिक्रमण हटवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकर्‍यांचे आमरण उपोषण


बीड (रिपोर्टर)- माजलगाव तालुक्यातील शेलापुरी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अतिक्रमण हटवून दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.


मौजे शेलापुरी येथील सर्वे नं. 74 मधील स्मशानभूमी व खळवाडी गावठाण्याच्या ओपन स्पेसच्या आरक्षित जागेतून सरपंच-उपसरपंच, ग्रामसेवक यांनी संगनमत करून आर्थिक व्यवहार करून 115 लोकांना अनाधिकृतपणे भूखंड वाटप केले. गावच्या विकसासाठी त्यांनी जागाच शिल्लक ठेवलीनाही. सदरील प्रकरणी योग्य ती कारवाई करून आरक्षीत जागेवरील अतिक्रमण हटवावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसन रामभाऊ भारस्कर हे व अन्य एक जण आमरण उपोषणाला बसले आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!