Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमbeed- पलटलेल्या ट्रकवर आठ वाहने धडकली 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू, मदत...

beed- पलटलेल्या ट्रकवर आठ वाहने धडकली 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू, मदत कार्य करणारे पोलीस कर्मचारी जखमी


बीड (रिपोर्टर)- धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोळवाडी नजीक नारळाचा ट्रक पलटल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली. याच दरम्यान भरधाव वेगात येणार्‍या सिमेंटच्या ट्रकने तिथे उभे असलेल्या दोन रिक्षांना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात 13 वर्षीय मुलगी जागीच ठार झाली तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. या पाठोपाठ अन्य तीन ते चार वाहने अपघातग्रस्त वाहनांवर धडकले. त्यात मदत कार्य करणार्‍या एका पोलिसालाही वाहनाने जोराची धडक दिल्याने तोही जखमी झाला. हा सर्व प्रकार केवळ या भागामध्ये सर्व्हीस रोड (पर्यायी रस्ता) नसल्यामुळे झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून गेल्या अनेक दिवसांपासून या भागात पर्यायी रस्ता द्या, अशी मागणी गावकर्‍यांकडून केली जात आहे.

244398143 3075318146090685 1896030652083823309 n


आज पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास नारळ घेऊन जाणारा टेम्पो (क्र. एच.आर.55 बी.ई. 8397) हा कोळवाडी जवळ उलटला. याची माहिती महामार्ग पोलिसांसह आयआरबीच्या कर्मचार्‍यांना मिळाल्यानंतर त्याठिकाणी महामार्ग पोलिस पीएसआय यशराज घोडके आणि त्यांचे कर्मचारी हे मदत कार्यासाठी तेथे आले होते. मदतकार्य सुरू असताना तेथे रिक्षा (क्र. एम.एच. 23 ए.आर. 0468) तसेच भाजीपाला घेऊन बीडकडे येणारा रिक्षा (क्र. एम.एच. 23. एक्स 5470) व का (क्र. एम.पी.68सी.2618) रस्त्याच्या बाजुला उभे होते. या वेळी सिमेंट घेऊन येणारा ट्रक क्र. (एम.एच. 18 ए.ए. 9679) रिक्षा व कारला धडकला.

246497577 845857752766701 7099254359078805363 n

या वेळी एका रिक्षात बसलेली वैष्णवी आनंद आडगळे (रा. शाहूनगर बीड, वय 13) हिचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली. धनंजय बापू वाघमारे (वय 39, रा. पााली) हे जखमी झाले आहेत व दुसर्‍या रिक्षातील रविंद्र नवनाथ ढाकणे (वय 45, रा. ढाकणवाडी ता. केज) हे जखमी झाले आहेत.

246772853 309439861011196 9099079507647990637 n

या वेळी अपघातग्रस्तांना मदत करत असताना अमलदार विलास यादवराव ठोंबरे हे जखमी झाले आहेत. जखमींना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. याच वेळी दोन दुचाकीही या पलटी झाल्या आहेत. एकावर एक आठ वाहने आदळल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महामार्ग पोलीसांनी मदत करत एकाबाजुने वाहतूक सुरू केली. त्यानंतर साडेचार वाजता सोलापूरकडून औरंगाबादकडे येणारा ट्रक (क्र. आर.जे. 14 जी.के.0598) हा भरधाव वेगाने येऊन पलटी होऊन बीड-सोलापूरकडे जाणारा ट्रक (क्र. एम.एच. 23 ए.यू. 9500) या ट्रकवर जावून धडकला. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आयआरबीच्या क्रेनने दोन्ही ट्रक बाजुला काढून वाहतूक सुरळीत केली. दरम्यन आयआरबीच्या वतीने कोळवाडी येथे सर्व्हीस रोड न केल्याने महामार्गावर दिशादर्शक फलक न लावल्याने आणि पथदिवे नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे कोळवाडी ग्रामस्थ वरील मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत.

Most Popular

error: Content is protected !!