Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडअंबाजोगाईपापा, आव्हान स्वीकारा, भाजपचा एकही नगरसेवक निवडून येऊ देऊ नका -धनंजय मुंडे...

पापा, आव्हान स्वीकारा, भाजपचा एकही नगरसेवक निवडून येऊ देऊ नका -धनंजय मुंडे राज्यासमोर संकटे भरपूर, शेतकर्‍यांना पीक विमा लवकर मिळणार -अजित पवार


पापा मोदींचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश
मुंबई (रिपोर्टर)- पापा, आव्हान स्वीकारा. उद्याच्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, या पद्धतीने निवडणूक लढवा. राष्ट्रवादीमध्ये तुम्हाला जेवढा मान-सन्मान मिळणार आहे तेवढाच मान-सन्मान जुन्या आणि नव्या पदाधिकार्‍यांना देऊन अंबाजोगाईच्या विकासासाठी तुम्ही-आम्ही कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले तर पापा मोदी हे बीड जिल्ह्यातले काँग्रेसचे भारदस्त नेतृत्व होते, विकास कामांसाठी ते सातत्याने प्रयत्नांची परिकाष्ठा करत असतात. त्यांचे आणि आपले विचार एक आहेत. यापुढे पापांची ताकद आणि राष्ट्रवादीची ताकद यामुळे केज मतदारसंघावर राष्ट्रवादीचा उमेदवार निश्‍चित निवडून येणार, अन्य मतदारसंघांसह राज्यातल्या काही जिल्ह्यातही पापा मोदींच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला मदत होणार, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पापा मोदींना शुभेच्छा देत यापुढे राष्ट्रवादीची ताकद कशी वाढेल आणि जनतेचे प्रश्‍न कसे सुटतील याकडे लक्ष देण्याचे सांगितले.


अंबाजोगाई नगरपालिकेचे सर्वेसर्वा पापा मोदी यांचा आणि त्यांच्या असंख्य सहकारी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांचा आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकंमत्री धनंजय मुंडे, मा. ना. संजय बनसोडे, आ. सतीश चव्हाण, आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, आ. बाळासाहेब आजबे, बजरंग सोनवणे, पृथ्वीराज साठे, राजेंद्र जगताप, शेख महेबूब, डॉ. नरेंद्र काळे, बसवराज पाटील, रावसाहेब चव्हाण, सय्यद सलीम, शिवाजी सिरसाट, सुरज चव्हाण, भाऊसाहेब तरमळे हे उपस्थित होते. राजकिशोर ऊर्फ पापा मोदी यांच्या समवेत औरंगाबाद मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. सदस्य विजय चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला.
पापा, आव्हान स्वीकारा भाजपाचा एकही
नगरसेवक निवडून येऊ देऊ नका

राजकिशोर ऊर्फ पापा मोदींच्या जाहीर प्रवेशादरम्यान राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, अंबा नगरी ही राजकारणाचे होका केंद्र आहे. ते हलले की, जिल्ह्याचं राजकारण बदलतं. पापा मोदींसाठी नगरपालिका निवडून आणणं अवघड नाही, परण आता पापा मोदींना माझं आव्हान आहे, ते आव्हान त्यांनी स्वीकारावं, उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही, असे काम करा. या परिसरामध्ये राष्ट्रवादीने भरभरून दिलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवारांनी सर्वप्रथम केज मतदारसंघाची उमेदवारी घोषीत केली. पहिली उमेदवारी मुंदडांना दिली, परंतु ऐनवेळी त्यांनी भाजपाची उमेदवारी स्वीकारली. त्यावेळी पृथ्वीराज साठेंना ऐनवेळी उमेदवारी द्यावी लागली. या निवडणुकीत राष्ट्रवादीला यश आलं नाही, परंतु आता आजच्या प्रवेशाने केज विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार हे निश्‍चित झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन्मानाची वागणूक मिळते. इथे जुने-नवे काही नाही, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस त्यामुळे पक्षाच्या वतीने आपला मान-पान कमी होणार नाही परंतु तुम्हीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांचा मान-सन्मान सांभाला, असेही धनंजय मुंडे यांनी या वेळी म्हटले.

मानापानाकडे लक्ष देऊ नका, संकटे भरपूर आहेत, लोकांचे काम करा
मोदी शेठच्या प्रवेशाने राष्ट्रवादीच्या बळकटीला मदत मिळणार -पवार

पापा शेठ मोदी काँग्रेसचे भारदस्त नेतृत्व, विकास कामांचा पाठपुरावा करताना मंत्रालयामध्ये मोदी शेठला अनेक वेळा पाहितलं, ते काँग्रेसमध्ये काम करत होते, त्यांची आणि आपली विचारधारा एक आहे. तुम्ही-आम्ही सर्व ग्रामीण भागातून आलो आहोत त्यामुळे लोकांचे प्रश्‍न किती महत्वाचे असतात हे सर्वश्रूत आहे. इथून पुढे मानापानाला महत्व द्यायचं नाही, पक्ष काही कमी पडू देणार नाही, सर्वांनी एकत्रित राहून काम करायचं. लोकांचे प्रश्‍न सोडवायचे, पापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने अंबाजोगाईलाच नव्हे तर जिल्ह्याला आणि जिल्ह्याबाहेरही त्यांचे गंगाखेड, परभणी, सोनपेठ, लातूर, उस्मानाबाद आदी भागात चांगले संबंध आहेत. त्यामुळे तिथेही राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. अनेक संकटे आपल्या समोर आहेत. पावसामुळे शेती उद्ध्वस्त झाली आहे, दहा हजार कोटींचे पॅकेज शेतकर्‍यांसाठी घोषीत केले आहे. शेतकर्‍यांना पीक विमा लवकरात लवकर मिळावा यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. काळजी करू नका, पीक विमा शेतकर्‍यांना मिळणार असल्याचे सांगून पापांची ताकद आणि राष्ट्रवादीच्या ताकतीमुळे केजमध्ये आपला विजय निश्‍चित असल्याचे या वेळी अजित पवारांनी सांगितले.


न.प.तर घेऊच केजचा आमदारही निवडून
आणू -पापा मोदी

गेली 35 वर्षे काँग्रेसमध्ये काम करत असताना अंबाजोगाई नगरपालिकेची सत्ता हातून जाऊ दिली नाही. इमाने इतबारे काँग्रेसमध्ये काम केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये न्याय मिळत नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये
निर्माण झाली. त्यामुळे मनाला वेदना होत असताना काँग्रेस सोडावी लागत आहे. या सर्व कार्यकाळामध्ये जेव्हा केहा जनतेचे काम घेऊन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे गेलो तेव्हा तेव्हा धनंजय मुंडेंनी आम्हाला सहकार्य केले. सर्वसामान्यांच्या कामाला महत्व देणारा, कुठलीही आडकाठी न आणणारा धनंजय मुंडेंसारखा नेता जिल्ह्यात अन्य कोणी नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला पाहिजे, अशी आम्हा सर्वांचे एकमत झाले अन् आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंडेंच्या नेतृत्वात काम करण्याचे ठरवले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी आपल्या उभ्या राजकीय आयुष्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले. त्यांचे राजकारण हे सकारात्मक राजकारण आहे. समाजकारणाला इथं प्रचंड वाव आहे. त्यामुळे आपण इथे काम करण्यासाठी आलो आहोत. नगरपालिका तर नक्कच घेऊ परंतु केजचा आमदारही राष्ट्रवादीचाच निवडून आणू, असा शब्द प्रवेशादरम्यान राजकिशोर ऊर्फ पापा मोदींनी दिला.

Most Popular

error: Content is protected !!