Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमलालबागमधील इमारतीला भीषण आग १९ व्या मजल्यावरुन पडून एकाचा मृत्यू

लालबागमधील इमारतीला भीषण आग १९ व्या मजल्यावरुन पडून एकाचा मृत्यू


मुंबईः मुंबईतील लालबाग परिसरातील वन अविघ्न पार्क सोसायटीतील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


राज्यात २१-५० वर्षे वयोगटात सर्वाधिक करोनारुग्ण, तर ४१ टक्के महिलांना बाधा
इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आग लागली असून ही आग २५ व्या मजल्यापर्यंत आगीचे लोट पोहोचले आहे. अद्याप आग विझवण्याची प्रक्रिया सुरू झालेली नसून अग्निशमन दलाच्या गाड्या प्रयत्न करत आहेत. ही आग लेव्हल चारची आहे.आगीची घटना घडताच १९ व्या मजल्यावरुन एका व्यक्तीने उडी घेतली होती. हा व्यक्ती जखमी झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी केईम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, या रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. केईएमचे डॉक्टर प्रवीण बांगर यांनी ही माहिती दिली आहे. या व्यक्तीचे नाव अरुण तिवारी (३०) असे होते. इमारतीला आग लागल्यानंतर या तरुणाने जीव वाचवण्यासाठी उडी घेतल्याची प्राथमिक माहिती होती. अविघ्न सोसायटी ही ६० मजल्याची इमारत असून या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आग लागली असून हळूहळू आग पसरत असून २५ व्या मजल्यापर्यंत आगीचे लोट पसरले आहेत. तसंच, पार्किंगपर्यंतही आग पसरली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इमारतीती अनेक लोक अडकून पडले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!