Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeकोरोनाशुक्रवारी १८ पॉझिटिव्ह ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या घटली

शुक्रवारी १८ पॉझिटिव्ह ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या घटली


बीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात कोरोनाची संख्या झपाट्याने कमी होत असून गेल्या दोन महिन्यांपासून स्थिर आहे. आज आलेल्या अहवालात १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर १ हजार ३६४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आरोग्य विभागाला शुक्रवारी १ हजार ३८२ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले आहे. यामध्ये आष्टी तालुक्यात ६, बीड ३, गेवराई २, केज ३, माजलगाव २ आणि पाटोदा तालुक्यातही २ रुग्ण आढळून आले आहेत. कालपर्यंत बीड जिल्ह्यात १५० ऍक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू होते. कोरोनामुळे आतापर्यंत बीड जिल्ह्यात २ हजार ८०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर १ लाख २२९ जणांनी कोरोनाला मात केली आहे. सध्या बीड जिल्ह्यात पॉझिटिव्ह रेट १.७ टक्के आहे तर मृत्यू रेट २.७१ टक्के आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!