Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईराजापूरकरांची दैना फिटणार की नाही? गावकर्‍यांच्या सुविधेसाठी १५ फुटाचा बंधारा बांधा

राजापूरकरांची दैना फिटणार की नाही? गावकर्‍यांच्या सुविधेसाठी १५ फुटाचा बंधारा बांधा


पावसाळ्यात गावकर्‍यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो
गेवराई (रिपोर्टर)- अतिरिक्त पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला होता. गोदावरी नदीला महापूर आला होता. राजापूर गोदावरी नदीच्या काठी असल्यामुळे येथील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी पुल नसल्यामुळे जीव मुठीत धरून त्यांना प्रवास करावा लागतो. प्रशासनाने राजापूरकरांच्या समस्या जाणून घेत १५ फुट उंचीचा पुल तात्काळ बांधून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.


जास्तीचा पाऊस पडल्यानंतर गोदावरी नदीला महापूर येतो. त्यामुळे नदीकाठच्या गावकर्‍यांना सतर्क राहावे लागते. गेवराई तालुक्यातील राजापूरच्या गावकर्‍यांची दरवर्षी पुलाअभावी दैना होते. याठिकाणी रस्तेही व्यवस्थीत नसतात. यंदा गावकर्‍यांना प्रचंड हाल सहन करावे लागले. गावकर्‍यांच्या सुविधेसाठी पुल बांधण्यात यावा, अशी मागणी सातत्याने करण्यात आली. मात्र या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आले. पंधरा फुट उंचीचा पुल बांधल्यानंतर गावकर्‍यांची समस्या सुटू शकते. यासाठी बांधकाम विभागाने गावकर्‍यांची मागणी मंजूर करत १५ फुटाचा पुल बांधावा, अशी मागणी राजापूरच्या ग्रामस्थांसह सरपंच संदीप राजगुरू यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!