Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडशिक्षक पात्रता टीईटीची परीक्षा पुन्हा लांबणीवर

शिक्षक पात्रता टीईटीची परीक्षा पुन्हा लांबणीवर


बीड (रिपोर्टर)- तब्बल ३ वर्षानंतर होणारी शिक्षक पात्रता चाचणी परिक्षा तब्बल तिसर्‍यांदा पुढे ढकलली असून आता ही परीक्षा ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे. शिक्षण परिषदेने दिलेल्या जाहिरातीनुसार सुरुवातीला ही परीक्षा १० ऑक्टोबरला होती. त्यात वाढ करून ही परीक्षा ३० ऑक्टोबरला होणार होती. मात्र पुन्हा ३० ऑक्टोबर ऐवजी ३० नोव्हेंबरला होणार आहे.

राज्यातील देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक असल्यामुळे त्या भागात जरी आचारसंहिता असली तरी ही आचारसंहितेचे कारण देत राज्य शिक्षण परिषदेने ३० ऑक्टोबर रोजी होणारी परिक्षा रद्द करून ती पुन्हा ३० नोव्हेंबरला घेण्यात येणार असल्याचे कळविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!