Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रकाय चौकश्या करायच्या तर करा, एखाद्याचं करिअर बरबाद करू नका अजित पवारांची...

काय चौकश्या करायच्या तर करा, एखाद्याचं करिअर बरबाद करू नका अजित पवारांची पुण्यात स्फोटक पत्रकार परिषद


जरंडेश्वर कारखान्याच्या भ्रष्टाचार आरोपावरून अजित पवारांनी वाचली विकलेल्या कारखान्यांची यादी फडणवीसांच्या काळातही कारखाने विकले;
एक कारखाना तर तीन कोटीलाच विकला गेला; चौकश्या करायच्यात तर करा परंतु सगळ्यांच्याच करा
विमा कंपनीने नाटकं करू नये, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या नसता फौजदारी दाखल करील


बीड (रिपोर्टर)- जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणार्‍या टिकेसह अन्य चौकशी यंत्रणेवर आक्रमक भाष्य करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कारखान्याच्या भ्रष्टाचार आरोपाचे पाळेमुळेच आज पत्रकार परिषदेतून महाराष्ट्रासमोर आणले. अजित पवारांची ही स्फोटक पत्रकार परिषद पुण्यात झाली. पवार आक्रमक होते. तुम्हाला जसा प्रश्‍न विचारायचा अधिकार आहे तसा मला ‘नो कॉमेंटस्’ म्हणण्याचा अधिकार आहे. मी आज सर्व विषयांवर बोलणार आहे. चौकशी करायच्यात, नक्की करा, कायदा सर्वांसाठी सारखा असतो. मग माझ्या घरातला मुलगा असो, तुमच्या घरातला असो वा त्यांच्या घरातला असो, दोषी असेल तर नक्की चौकशी करा उगाच नाव घेऊन एखाद्याचं करिअर बरबाद करू नका. आतापर्यंत ६५ कारखाने विकले गेले. परंतु काही कारखान्यांवरच प्रश्‍नचिन्ह का? असा सवाल करत फडणवीसांच्या काळातही कारखाने विकले गेले ना, काही कारखाने तर ३ कोटीला विकले गेले. ज्या गोष्टी झाल्या त्या रितसर, कायदेशीर झाल्या. उगाच काहीतरी आरोप करायचे, गरळ ओकायची आम्हाला तेवढा वेळ नाही. आम्हाला लोकांची कामे करायची आहेत, असे म्हणत अजित पवारांनी आज विरोधकांच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले.


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणार्‍या टीकेवर आज उत्तर दिलं. त्यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील साखर कारखानादारीबद्दल अनेक बातम्या आल्या. मी अनेकदा उत्तर देणं टाळलं. वस्तुस्थिती समोर यावी म्हणून आज बोलत आहे. एसीबी, पोलिस आणि सहकार विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली, मात्र त्यात काहीही निष्पन्न झालं नाही. साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप केले जात आहेत, २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार हा खोटा आरोप आहे, असंही अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांनी राज्यातील विकल्या गेलेल्या कारखान्यांची भलीमोठी यादीच वाचून दाखवली. त्यांनी कारखाने विक्रीच्या व्यवहाराचे रकमांसह वाचन करुन दाखवलं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकूण ३० कारखाने विकले असल्याची यादी अजित पवारांनी सांगितलं.
अजित पवारांनी सांगितलं की, राज्य शिखर बँकेने राज्यातील वेगवेगळे ३० सहकारी साखर कारखाने विकले. सहा सहकारी साखर कारखाने जिल्हा मध्यवर्ती बँकानी विकले. सहा सहकारी साखर कारखाने राज्य सरकारच्या परवानगीने विकण्यात आले. तीन सहकारी साखर कारखाने कारखान्यांनी स्वतः विकले. बारा सहकारी साखर कारखाने भाडेकरारावर किंवा सहयोगी करारावर चालवण्यास देण्यात आलेत, अशी माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रातील ६४ सहकारी साखर कारखाने विकत घेतले गेलेत किंवा एकाने विकत घेऊन दुसर्‍याला चालवायला दिलेत किंवा भाडेकरारावर चालवले जात आहेत, असं अजित पवार म्हणाले.
जरंडेश्वर साखर कारखान्याबाबबत सतत माझ्या कुटुंबांचा सतत उल्लेख केला जातो. मला (पान ७ वर)
लोकांना सांगायचंय की मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याने थकलेले पैसै न भरल्याने कारखान्याचा ताबा घेतला.जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीमधे कोणताही गैरव्यवहार झालेला नाही असं सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी म्हटलं आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

अजित पवार म्हणाले की, नियम सर्वांना सारखेच आहेत. आज सगळी कागदपत्रं घेऊन आलो आहे, असं ते सुरुवातीला म्हणाले. ड्रग्ज प्रकरणात कुणाचाही मुलगा असेल तर त्यावर कारवाई करा, असंही ते म्हणाले. जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणार्‍या टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना कालच इशारा दिला होता. राज्यात केवळ जरंडेश्वर हा एकमेव कारखाना नाही. कोणते कारखाने कोणी कितीला विकत घेतले याची माहिती आपण पत्रकार परिषद घेऊन देऊ, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आपल्या नातेवाईकांची बदनामी केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. तर काहींकडून मला बदनाम करण्यासाठी माझ्याविरुद्ध गरळ ओकली जातेय. मी बेईमान आहे की काय ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी बेईमानी कधी केली नाही, ते आमच्या रक्तात नाही, अशा शब्दात अजित पवारांनी इशारा काल दिला होता. आज अजित पवारांनी पत्रकारांच्या प्रश्‍नांना आक्रमक उत्तर दिले. ते काही तरी म्हणतात म्हणून काहीतरी म्हणू का, तसं मग देशातील पेट्रोलचे भाव माझ्यामुळेच वाढलं. असा टोलाही त्यांनी लगावला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!