Sunday, January 23, 2022
No menu items!
HomeUncategorizedधुमेगावातील भाजपा राष्ट्रवादीत विलीन

धुमेगावातील भाजपा राष्ट्रवादीत विलीन

अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत उपसरपंचासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

गेवराई, दि.२३ (प्रतिनिधी) ः- वर्षानुवर्षे भाजपाला मताधिक्य देणार्या धुमेगावातील भाजपा उपसरपंच हनुमान झिरपे यांच्या नेतृत्वाखाली अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाली. माजी आ.अमरसिंह पंडित यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहिर प्रवेश केला. आजवर भाजपाला मतदान दिल्याचा पश्‍चाताप होत असल्याची भावना याप्रसंगी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
	चकलांबा जिल्हा परिषद गटातील धुमेगाव भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजला जात होता, आजवरच्या अनेक निवडणुकांमध्ये सातत्याने भाजपाला या गावातून मताधिक्य मिळाले. सत्तेत असतानाही भाजपा आमदारांनी गावच्या विकासासाकडे दुर्लक्ष केले, त्यांच्या नाकर्तेपणामुळे भाजपाला मतदान केल्याचा आम्हाला पश्‍चाताप होत असल्याची भावना उपसरपंच हनुमान झिरपे यांनी व्यक्त केली. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शुक्रवार, दि.२२ रोजी सायंकाळी जाहिर प्रवेश केला. माजी आ.अमरसिंह पंडित यांनी त्यांचे स्वागत करून गावच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्‍वासन दिले. कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगनपाटील काळे, माजी जि.प.सदस्य डॉ.विजयकुमार घाडगे, पं.स.सदस्य तय्यबभाई, शिवाजी महानोर, नारायण जरांगे, लक्ष्मण जांभळे, बबन गलधर, राधाकिसन शेंबडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
	धुमेगाव येथील भाजप कार्यकर्ते तथा सरपंच परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष उपसरपंच हनुमान झिरपे, ग्रा.पं.सदस्य गोविद जांभळे, ज्ञानेश्‍वर कुल्हाळ, संजय कुलाळ, अर्जुन पाटोळे, शहादेव धुमाळ, मनोहर बळवंत, आसाराम घोडके, अशोक घोडके, अमर डोंगरे, शाम मोंडे, लक्ष्मण मोंडे, रामेश्‍वर निंबाळकर, रामदास धुमाळ, बाळू धुमाळ, गणेश कुलाळ, भक्तराज झिरपे, जालिंदर महाराज झिरपे, अंकुश महाराज झिरपे, राजेंद्र मस्के, भानुदास नाटकर, केदार नाटकर, शरद जांभळकर, प्रल्हाद अण्णासाहेब झिरपे, गणेश झिरपे, बंटी झिरपे, गोविंद झिरपे, अशोक झिरपे, अर्जुन बळवंत आदी कार्यकर्त्यांनी माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहिर प्रवेश केला. कार्यक्रमात धुमेगावच्या विकासासाठी भविष्यात प्रयत्न करण्याचे आश्‍वासन माजी आ.अमरसिंह पंडित यांनी केले. कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!