Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडएसटी महामंडळ ग्रॅच्युटीचे पैसे देईना कुटुंबियांनी दिला आत्मदहनाचा इशारा

एसटी महामंडळ ग्रॅच्युटीचे पैसे देईना कुटुंबियांनी दिला आत्मदहनाचा इशारा


बीड (रिपोर्टर): एसटी महामंडळामध्ये कार्यरत असणार्‍या एका कर्मचार्‍याचे निधन झाल्यानंतर त्याच्या ग्रॅच्युटीचे पैसे महामंडळाकडून देण्यास टाळाटाळ होत असल्याने कुटुंबियांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
जालिंदर दिगांबर कळसकर हे बीडच्या एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते. त्यांचे ११-४-२०२० रोजी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मिळणारी ग्रॅच्युटी कुटुंबियांनी वेळोवेळी महामंडळाकडे मागितली मात्र महामंडळाकडून ग्रॅच्युटी देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

याबाबत कळसकर अमोल जालिंदर यांनी अजयकुमार मोरे यांच्याकडे अनेकवेळा विनवनी केली मात्र ते याकडे गांभिर्याने पाहत नसल्याने कुटुंबियांनी चक्क आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन राज्य परिवहन महामंडळाला देण्यात आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!