Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडपाच तालुके शुन्यावर ६ तालुक्यात ९ पॉझिटिव्ह

पाच तालुके शुन्यावर ६ तालुक्यात ९ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात नगन्य दिसून येत असून आज आरोग्य विभागाकडून आलेल्या आकडेवारीत जिल्ह्यातील पाच तालुक्यातील एकही बाधित आढळून आला नाही तर ६ तालुक्यात केवळ ९ कोरोना बाधित आढळून आल्याने समाधान व्यक्त केले जात असून तेराशेपेक्षा अधिक जणांची चाचणी केल्यानंतर ९ बाधित आढळले आहेत.

बीड जिल्ह्यातील परळी, धारूर, वडवणी, माजलगाव, शिरूर या पाच तालुक्यात आज एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही. १ हजार ३५४ संशयितांच्या चाचण्या केल्या असता यामध्ये १ हजार ३४५ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तर ९ जण पॉझिटिव्ह आले. यामध्ये अंबाजोगाई २, आष्टी २, बीड १, गेवराई १, केज १ आणि पाटोद्यातील दोन जणांचा समावेश आहे. या ९ मध्ये ७ महिला तर दोन पुरुषांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!