Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईपं.स.च्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांकडून नागरिकांची लूट

पं.स.च्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांकडून नागरिकांची लूट


गेवराई (रिपोर्टर) गेवराई पंचायत समिती कार्यालयात अधिकार्‍यांनी धुमाकूळ घातला असून विविध येवजनेच्या नावाखाली पैशाची वसुली करत लूट करण्यात येत असल्याचे असून याकडे गटविकास अधिकारी हे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात यामध्ये शेतकर्‍यांसाठी गाई-गोठा, शेती उपयुक्त औजारे, मोहगणी वृक्ष लागवड यासारख्या विविध योजनेमध्ये अनेक जण अर्ज करत आहेत. मात्र हे योजनेत मंजूरी देण्यासाठी
पंचायत समिती मधील अधिकारी व कंत्राटी कर्मचारी सर्रास लाखो रुपयांची वसुली करत आहेत. मात्र या योजनेतून एकही फाईल मंजुर होत नाही. ज्या शेतकर्‍यांनी या योजनेत प्रस्ताव दिले ते अद्यापही धूळखात पडलेले असून ते मंजूर होतील की नाही याची ही शाश्वती नाही. मात्र या मुजोर अधिकार्‍यांसह कंत्राटी कर्मचार्‍याना कुठलाच धाक नसून याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालून चौकशी करत सबधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

तीन महिन्यांपासून डाटा एन्ट्री ऑपरेटर
नाही ; अनेकांची कामे खोळंबली

पंचायत समिती मध्ये रिजेक्ट ट्राजक्शन प्रकरणी येथील डाटा ऑपरेटर येवले व एपीओ कोठुळे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर गेल्या तीन ते चार महिन्यापासून हे पद रिक्त असून त्याजागी अद्यापही नवीन नियुक्ती झाली नसल्यामुळे या विभागातील वृक्षसंगोपन, घरकुल, विविध योजनेच्या नवीन मंजुरी असे अनेक कामे खोळंबली असल्याने या जागेवर तात्काळ डेटा ऑपरेटरची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!