Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडपरळी, पांगरी (गोपीनाथगड) येथे राष्ट्रवादीच्या वतीने ना. भुजबळ यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत

परळी, पांगरी (गोपीनाथगड) येथे राष्ट्रवादीच्या वतीने ना. भुजबळ यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत


अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ गोपीनाथगडावर नतमस्तक

परळी (रिपोर्टर) आज विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने बीड जिल्हा दौर्‍यावर आलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी परळी तालुक्यातील पांगरी येथे जाऊन गोपीनाथ गडावर स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होत दर्शन घेतले.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या वतीने यावेळी परळीत ठिकठिकाणी व पांगरी (गोपीनाथगड) येथे ना. भुजबळ यांचे फटाके,हार,फेटा,ढोल, ताशाच्य गजरात जंगी स्वागत करण्यात आले. ना. छगन भुजबळ हे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर प्रथमच परळी तालुक्याच्या दौर्‍यावर होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे परळी नगर परिषदेतील गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्यासह सहकार्‍यांनी ना. भुजबळ यांचे जंगी स्वागत केले. यावेळी न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कराड , शिवाजी सिरसाट, न.प.सभापती गोविंद मुंडे, अनवर मिस्कीन, नगरसेवक विजय भोयटे , शंकरराव अडेपवार, रवि मुळे, भिमराव डावरे, परळी पं.स.सभापपती पिंटू मुंडे, कृ.उ.बा.समिती सदस्य सुर्यभान मुंडे, प.स.सदस्य वसंत तिडके,सटवाजी फड, सरपंच कांताभाऊ फड , विश्वनाथ देवकते, प्रभू अंधळे उपसरपंच श्रीनिवास मुंडे, रा.कॉं.युवक अध्यक्ष गोविंद कराड, दत्ता कराड, बंडु गुट्टे, बालाजी मुंडे यांसह आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!