Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडधक्कादायक काढणी केलेल्या सोयाबीनच्या ३९ पोत्यांची चोरी, चोरट्यांमुळे नागरिक दहशतीखाली

धक्कादायक काढणी केलेल्या सोयाबीनच्या ३९ पोत्यांची चोरी, चोरट्यांमुळे नागरिक दहशतीखाली


माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील घटना
बीड/पात्रुड (रिपोर्टर)- यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीही मातीसह वाहून गेल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आला आहे. पात्रुड येथे एका शेतकर्‍याने अशा परिस्थितीतही मोठी मेहनत करून पाच एकर शेतीमध्ये सोयाबीनचे पीक घेतले होते. काल रात्री सोयाबीन काढून शेतात ३९ पोते शिऊन ठेवले होते. रात्री उशीर झाल्याने शेतकरी घरी गेले असता अज्ञात चोरट्याने ते ३९ पोते चोरून नेले. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पात्रुड येथे रोज अशा चोर्‍या होऊ लागल्याने नागगरिक दहशतीखाली वावरत आहेत. येथील चौकीच्या आसपासच अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने येथील पोलीस गुंडांना अभय देण्यासाठी आहेत की जनतेच्या रक्षणासाठी? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.


पात्रुड येथील शेतकरी कुलदीप इंद्रजीत शिंदे यांनी त्यांच्या पाच एकर शेतात सोयाबीनचे पीक घेतले होते. अतिवृष्टीने प्रचंड नुकसान होऊनही त्यांनी मोठी मेहनत घेतल्याने पाच एकरमध्ये त्यांना ११७ पोते सोयाबीन झाली होती. ही सोयाबीन त्यांनी शेतात वाळू घातली होती. काल रात्री यातील ३९ पोते सोयाबीन भरून ते शिऊन शेतात ठेवले होते. पाऊस पडल्याने शेतात वाहन जात नसल्याने त्यांनी तेथेच पोते झाकून ठेवले होते आणि रात्री साडेबारा वाजता ते घरी आले होते. दिवसभर काम करून थकल्यामुळे ते पुन्हा शेतात न जाता घरीच झोपले होते. सकाळी उठून ते जेव्हा शेतात गेले तेव्हा शिवून ठेवलेले ३९ पोते चोरटट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही माजलगाव-तेलगाव रस्त्यावरील लाणेवाडी फाटा येथे घडली. चोरट्याने शेतात गाडी जात नसल्याने १ हजार मिटर पोते उचलून रस्त्याव नेऊन ते लंपास केल्याचे समजते. या प्रकरणी शिंदे यांनी माजलगाव ग्रामीण पोलीसांना घटनेची माहिती दिल्यानंतर बीट अमलदार यांनी पहाणी केली. पात्रुड परिसरात रोज अशा घटना घडत आहेत. पात्रुडमध्ये बाजारासाठी येणार्‍या नागरिकांची दिवसाढवळ्या वाटमारी होते. रोज दुचाकी-चारचाकी चोरीला जातात. पोलीस फक्त तक्रार नोंदवून घेतात पुढे काहीच होत नाही. त्यामुळे चोरट्यांचे फावत आहे. पात्रुड येथे नागरिकांच्या रक्षणासाठी पोलीस चौकी आहे मात्र या चौकी भोवतीच अवैध धंदेवाल्यांचे अड्डे आहेत. याकडे येथील पोलीसांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होते. त्यामुळे ही चौकी या अवैध धंदेवाल्यांना अभय देण्यासाठी की सामान्यांच्या रक्षणासाठी आहे? असा प्रश्‍न नागरिकांना पडत असून याकडे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!