Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- राजा, प्रजा पिढी, क्षेत्री दुष्चिताशी तोडी

अग्रलेख- राजा, प्रजा पिढी, क्षेत्री दुष्चिताशी तोडी


गणेश सावंत
मो. नं. 9422742810
ईश्‍वराच्या चरित्राला परमामृत म्हटले जाते. भक्तांच्या चरित्राला धर्मामृत म्हटले जाते. हे परमामृत आणि धर्मामृत महाराष्ट्राच्या मातीतल्या कणा-कणात रुजलेलं आहे. महाराष्ट्र म्हटलं की, संस्कार, संस्कृती, धैर्य, शौर्य आणि संघर्षाची गाथा डोळ्यासमोर येते. ईश्‍वराच्या चरित्राला परमामृताचे स्वरुप याच महाराष्ट्राच्या भक्तांनी (संतांनी) उभ्या देशाला आणि जगाला येथूनच दाखवून दिले. त्याच महाराष्ट्रात शक्ती आणि भक्तीची परमामृते आज विटाळण्याचा अट्टाहास दिल्ली तक्ताकडून सुरू आहे का? अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. ज्या महाराष्ट्राकडे संतांची भूमी म्हणून पाहितलं जातं, जो महाराष्ट्र शौर्याचा हिमालय आहे हे छातीठोकपणे सांगितलं जातं, ज्या महाराष्ट्राने स्वाभिमान आणि अभिमान जपण्यासाठी घराघरावर तुळशीपत्र ठेवले, छातीचा कोट केला, त्या महाराष्ट्रावर आज नशेबाज आणि गंजिट्यांची छाप मारण्याचा प्रयत्न केला जातो. जिथं अमृतातही पैजा जिंके, ऐसे अक्षर मिळविणं, हे सांगणारे संत ज्ञानेश्‍वर आजही आहेत. जिथे वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठाव, इतरांनी वहावा भार माथा म्हणणारे तुकोबा इथेच आहेत. जिथं शाहू-फुले-आंबेडकरांची नाळ आहे, जिथं संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांची गाथा आजही स्वाभिमानाने ऐकली जाते. त्या महाराष्ट्राला नशेबाज म्हणण्याचा अट्टाहास केवळ सत्तेच्या लोभापायी होत असेल तर दिल्ली तक्ताचे शेम शेम म्हणून निषेधच करावा लागेल. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जो काही नशेबाजांचा हल्लाकल्लोळ माजवण्याचा प्रयत्न काही तथाकथीत महाराष्ट्र द्वेषांकडून होत आहे त्या तथाकथीतांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र झुकणार नाही आणि शापीतही होणार नाही.

हा महाराष्ट्र ना कधी झुकला
ना कधी झुकेल

हे छातीठोकपणे सांगण्याचं धाडस महाराष्ट्राच्या मातीत निपजलेला व्यक्तीच करू शकतो. गेल्या दोन-चार वर्षांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात जी राजकीय स्थित्यांतरे घडली, सत्तेच्या लोभापायी महाराष्ट्रात जो राजकारण्यांचा घोडाबाजार झाला, कधी पहाटे सत्ता काबीज करण्याहेतु शपथविधी झाल्या, कधी लोकप्रतिनिधींना पळवण्यात आले, कोंडण्यात आले, लपवून ठेवण्यात आले, तिथंही दिल्लीतक्त आघाडीवर होतं. महाराष्ट्र काबीज करण्यात दिल्ली तक्ताला यश आलं नाही आणि तिथच दिल्ली तक्ताने महाराष्ट्र द्वेषाचा चष्मा आपल्या डोळ्यावर लावला. विनंती करून साम-दाम-दंडाने महाराष्ट्र काबीज होत नाही, महाराष्ट्राची सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हाती मिळत नाही, हे दीड वर्ष जेव्हा दिल्लीतील भाजपाच्या सर्वेसर्वाच्या लक्षात येते तेव्हा महाराष्ट्राला चारही बाजुने साखळदंडात राजकीयदृष्ट्या बांधून ठेवण्याचा प्रयत्न झाला. परंतु इथेही यश आलं नाही मग जसं की, एखाद्या व्यक्तीला पैशाने लोभाने, ताकतीने वश करता येत नाही, तो आपल्यासमोर झुकत नाही. तेव्हा त्या व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम केले जाते. तसं इथंही महाराष्ट्र आपल्या ताब्यात येत नाही, महाराष्ट्राची जनता असत्य स्वीकारायला तयार नाही, तेव्हा देश पातळीवर आणि जगभरात महाराष्ट्र बदनाम कसा होईल यासाठी दिल्ली तक्ताची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात सर्वाधिक नशेबाज असल्याचे सांगते. अन्य राज्यात क्विंटलवर चरस, गांजा, अफीम पकडला जातो, तिथली गोष्ट जगासमोर सोडा, देशासमोर येत नाही. इथे मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरीत एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे एक ग्राम चरस-गांजा, अफिम सापडलं तर अवघा महाराष्ट्र नशेबाज असल्याचा डांगोरा पिटवला जातो. हिंदी सिनेमासृष्टीत आघाडीवर असेला शाहरुख खान याच्या मुलाच्या नशेबाजीवरून महाराष्ट्रात जो रणकंद माजवला जात आहे तो नशिली पदार्थांच्या कायद्यासाठी आहे की, महाराष्ट्राला बदनाम करून स्वत:च्या फायद्यासाठी आहे हेच समजाला मार्ग नाही.

महाराष्ट्रामध्ये नशेबाजांचे वर्ण
आहेत. हे सांगायला आम्ही कधीच कचरणार नाहीत, भारतीय जनता पार्टीला संलग्न असलेल्या नशेबाजांना इथं सर्वश्रेष्ठ दर्जा दिला जातो. मात्र भारतीय जनता पार्टीच्या विचाराला जो विरोध करतो, केंद्रस्थित सरकारला जो प्रश्‍न विचारतो त्याच्या घरात एखाद दुसरा नशा करणारा असेल तर त्याला इथं वेगळा न्याय दिला जातो. जो दिल्लीला तक्ताला सवाल विचारेल तो केव्हा कधी आंदोलनजीवी, अतिरेकी अथवा नशेबाज होईल हे सांगता येत नाही. आर्यन खान हा जसाच रेव पार्टीत पकडला गेला तसा तिथं अन्य दोघे जे की, भाजपाशी संलग्न होते तेही पकडे गेले. मात्र त्यांना जगासमोर सोडा, मुंबईच्या चार माणसासमोर आणण्याचं धाडस केंद्राच्या ताब्यात असलेल्या तपास यंत्रणेने केलं नाही. हेही सोडून द्या, गेल्या पाच-सहा महिन्यांपूर्वी वा त्या पेक्षा आधी टेलिव्हीजन अभिनेत्रीच्या नवर्‍याला मोठ्या प्रमाणावर गांजासह पकडं होतं. केवळ ती भारतीय जनता पार्टीच्या विचाराला सलाम करते अथवा भाजपाचे सिम्बॉल छातीवर लावून प्रचार करते म्हणून तिच्या नवर्‍याला अवघ्या 12 तासात जामीन मिळतो म्हणजे महाराष्ट्रात नशाही भाजपाच्या छताखाली केली तर ती नशा नाही, म्हणजेच भाजपाच्या छत्रछायेखाली दारूही अमृत होते हेच यातून सिद्ध होत आहे. आर्यन खानच्या माध्यमातून जो कोणी सवाल विचारत असेल तर तो मुस्लिम धार्जिनी म्हणून त्याच्याकडे पाहण्याचं धोरण आखलं जातं, आर्यन खानच्या प्रकरणावरून हिंदू विरुद्ध मुसलमान ही चर्चा घडवून आणली जाते, तपासी अधिकारी हिंदू आहे आणि आरोपी मुसलमान आहे यापेक्षा या लोकशाहीच्या देशातलं संविधान धर्मापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे हे सांगायला कोणी तयारच नाही. या सर्व प्रकरणांमधून दिल्ली तक्ताने जो महाराष्ट्राला खिजवण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला तो निषेधार्ह आहे. ‘सांडीले आचार द्विज चहाढ झाले चोर, राजा-प्रजा पिढी खेत्री दुष्चितांशी तोडी’, असं तुकोबांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रासाठी जरी दिल्ली तक्तावरचा राजा आज महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला पिढीतच आहे. महाराष्ट्रामध्ये केवळ भरातीय जनता पार्टीची सत्ता आली नाही, याचं दु:ख गेल्या दोन वर्षापासून भाजपाच्या भाळी लागलं आहे. त्या दु:खाच्या ईर्ष्येेतून महाराष्ट्राच्या बदनामीचा विडा जो नशेबाजांच्या माध्यमातून उचलला आहे त्या विड्याचा महाराष्ट्र कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही. सोळाव्या शतकामध्ये महाराष्ट्रावर चाल करून येताना असाच विडा उचलला होता. ज्याने विडा उचलला होता त्याचे प्रतापगडाच्या पायथ्याशी काय झाले हे सर्वज्ञात आहे.


महाराष्ट्र हा ना झुकला
ना झुकेल

हे पुन्हा-पुन्हा सांगण्याचे कारणही महाराष्ट्राचा इतिहासच आहे. आजपर्यंत अनेक वेळा महाराष्ट्राला झुकवण्यासाठी शतकोनि शतके अनेकांनी प्रतय्न केले, काहींना यशही आले मात्र पुन्हा तेवढच्या ताकतीने महाराष्ट्र पेटून उठला. स्वाभिमान जागृत केला, अभिमानाने छातीचा कोट केला आणि पुन्हा महाराष्ट्रावर स्वाभिमानाचा झेंडा तेव्हा तेव्हा फडकवलाच गेला. आताही महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा प्रयत्न दिल्लीतक्त असलेल्या भाजपाकडून होत आहे. इतिहास साक्षीाला आहे दिल्ली तक्ताने सातत्याने महाराष्ट्राला दुजीवागणूक दिली आहे. आज केवळ महाराष्ट्रामध्ये भाजपाची सत्ता नाही म्हणून केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्रातील लोकशाही आघाडी सरकारच्या पुढार्‍यांना धडा शिकवण्याहेतू महाराष्ट्राची आणि तेतील जनतेची जी फरफट करत आहे त्याचे पाप नक्कीच दिल्ली तक्ताच्या माथी लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली, शेतकरी आत्महत्या करत आहेत, परंतु आज पावेत केंद्र सरकारने महाराष्ट्राला कुठली मदत केल्याचे ऐकण्यात नाही. दोन वर्षाच्या कालखंडामध्ये कोरेनाशी दोन हात करताना इथल्या प्रत्येक नागरिकाला लढवय्या बनावं लागलं. त्या काळातही केंद्र सरकारने अडेलतट्टुची भूमिका घेतली होती. महाराष्ट्राला अद्यापही जीएसटीचे पैसे दिले गेले नाहीत. महाराष्ट्राची कोंडी कशी होईल हे पदोपदी पाहण्याचं काम सरकारकडून केलं जातं आणि त्याचा त्रास महाराष्ट्रातील जनतेला सहन करावा लागतो. तुळशीवृंदावन डोक्यावर घेतलेल्या इथल्या सुवासिनीच्या माथ्यावर

गांज्याचं झाड
दाखवण्याचा जो प्रयास भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्रात केला जात आहे त्या प्रयासाला यश येईल हे सांगणे कठीण आहे. कारण हा महाराष्ट्र शक्ती आणि भक्तीच्या अमृतावर धैर्य ठेवून संघर्ष करत यशाची पताका फडकावत आला आहे. इथल्या वारकर्‍याच्या कपाली चंदन आणि गळ्यात तुळशीची माळ आहे, इथला प्रत्येक व्यक्ती साधू-संत-सुफींच्या विचारांवर आचारण करत आहे आणि इथल्या प्रत्येक व्यक्तीला लढाया या सत्तेच्या असतात, जातीच्या नसतात हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून ठेवलेले आहे. शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राला तुम्ही कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी ‘तुम लाख कोशी करलो मुझे बदनाम करने की…’ असं म्हणत उभा महाराष्ट्र ‘मै जब जब बिखरा हुँ तब तब दुगनी रफ्तार से निखरा हुँ’.

Most Popular

error: Content is protected !!