नेकनूर (रिपोर्टर): नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणी खुर्द येथे एका धाब्यावर अनाधिकृतपणे देशी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून दारूसह इतर साहित्य असा 8 हजार 507 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हिंगणी खुर्द येथील हॉटेल रायगडमद्यङे देशी व विदेशी दारूची अनाधिकृतपणे विक्री होत होती. सदरील घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर उपनिरीक्षक अजय पानपाटील, कर्मचारी नारायण खटाणे, सचीन डिडूळ, सचीन मुरुमकर, रामनाथ पुंडे यांनी घटनास्थळी जावून हॉटेलची झाडाझडती घेतली. यामध्ये देशी-विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी दारूसह मुद्देमाल असा एकूण 8 हजा 507 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी पांडुरंग खाडे (रा. हिंगणीखुर्द) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.