पाटोदा (रिपोर्टर): गाडीत ठेवलेले पावणे तीन लाखांची बॅक काच फोडून लंपास केल्याची घटना पाटोदा शहरात घडली. या प्रकरणी अनोळखी विरोधात पाटोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव देवीदास येवले या आडत दुकानदाराने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पाटोदा येथील कांकरीया कृषी सेवा केंद्र येथे ते आपली गाडी घेऊन उभे असताना अज्ञात अनोळखी इसमाने गाडीची काच फोडून 2 लाख 80 हजार रुपये असलेली बॅग लंपास केली. या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस नाईक गडकर हे करत आहेत.