तीन वर्षात 80 अपघात, 72 जणांचा मृत्यू अपघात रोखण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार
बीड (रिपोर्टर): राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून त्यावर उपाययोजना आखण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू आहे. बीडच्या राष्ट्रीय महामार्गावर 11 अपघात स्पॉट आहेत. या ठिकाणी तीन वर्षात ऐंशी अपघात होून त्यात 72 जणांचा मृत्यू झाला आहे.
सडक अपघातामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊ लागला आहे. आतापर्यंत प्रशासकीय पातळीवर अपघात रोखण्याचे अनेक प्रयत्न झाले मात्र अपघात रोखण्यात शंभर टक्के यश आलेले नाही. राष्ट्रीय महामार्गावर राज्यभरात 3 वर्षात 2401 अपघात झाले. यात 1606 जणांचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर अकरा अपघातांचे स्पॉट आहेत. याठिकाणी 80 अपघात होऊन त्याठिकाणी 72 जणांचा मृत्यू झालेला आहे. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी हायवे विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.