Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमफरार आरोपींची शोध मोहिम ऑक्टोबर महिन्यात चौदा आरोपींना केले अटक

फरार आरोपींची शोध मोहिम ऑक्टोबर महिन्यात चौदा आरोपींना केले अटक

बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातील फरार आरोपींच्या विरोधात पोलीस प्रशासनाने शोध मोहिम हाती घेतली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याला कशा सूचना वरिष्ठ विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार माहे ऑक्टोबर 25 तारखेपर्यंत चौदा आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.


विविध गुन्ह्यातील फरार आरोपींची शोध मोहिम सुरू आहे. जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्या अंतर्गत (1029) पाहिजे. (119) फरार व स्टँडींग वॉरंटमधील 82 आरोपींच्या बीट व बीट अंतर्गत गावनिहाय याद्या तयार करून सर्व पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले आहेत. सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकार्‍यांना आरोपीच्या नावाच्या याद्या एका मोठ्या फ्लेक्सवर लावून तो फ्लेक्स पोलीस स्टेशनच्या समोर दर्शनीय भागात लावून फ्लेक्सवर आरोपीची याद्या पाठवण्यात आलेल्या आहेत. या मोहिमे अंतर्गत माहे ऑक्टोबर 2021 मध्ये 25.10.2021 पर्यंत 14 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. संभाजीनगर पोलीस स्टेशन परळी यांनी सुदिप उर्फ पाप्या सोनवणे यास अटक केली. परळी ग्रामीणने राजाभाऊ नंदागौळ, भागवत गिते या दोघांना अटक केली. अंमळनेर पोलीसांनी पाच वर्षापासून फरार असलेल्या छत्रभुज उर्फ शत्रुघ्न मोहन मोरे याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पाटोदा पोलीसांनी किशोर पवरे, बाबु टेकाळे, जहिर शेख यांना अटक केली. एकंदरीत ऑक्टोबर महिन्यात (8) पाहिजे व (1) फरार असे एकूण 9 आरोपींना पोलीसांनी शिताफीने पकडून अटक केली. तसेच उर्वरित पाच फरार आरोपी न्यायालयात हजर होवून निकाली निघालेले आहेत. तसेच या मोहिमे अंतर्गत दि.13.2.2021 पासून आजपर्यंत (270), फरार आरोपी (38) व स्टँडींग वॉरंट (7) असे एकूण (315) आरोपीतांची नावे अभिलेखावरून कमी करण्यात बीड पोलीसांना यश आले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाख बीड, सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!