घोगस पारगावमध्ये गांज्याची लागवड
पंकज कुमावत यांची धाड
27 लाखाचा गांजा जप्त
बीड रिपोर्टर
शिरुर तालुक्यातल्या घोगस पारगाव येथे एका शेतकर्याने गांज्याची झाडे लावली. सदरील या गांज्याच्या झाडाची माहिती पोलिस प्रशासनाला झाल्यानंतर पंकज कुमावत यांनी त्या ठिकाणी धाड टाकून 27 लाखाचा गांजा जप्त केला.
संभाजी हरिभाऊ कराड वय 37 वर्षे याने आपल्या शेतात गांजाच्या झाडे लावली. याची माहिती पोलिस प्रशासनाला झाल्यानंतर पंकज कुमावत यांनी या ठीकाणी धाड टाकून 554 किलो ग्रॉम कांजा ज्याची किंमत 27 लाख 27 हजार 700 रुपये इतकी आहे. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज कुमावत, निरज राजगुरु, खाडे मॅडम, एकशिंगे, इंगळे, तादळे, राजेश पाटील, आनंद शिंदे, यळे, खेळकर, बालासाहेब डापकर, दिलीप गिते. अनिल मंदे, संतोष गिते यांनी केली आहे.