Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडबसमध्ये मजुरास हृदयविकाराचा झटका उपचारा दरम्यान मजुराचा मृत्यू

बसमध्ये मजुरास हृदयविकाराचा झटका उपचारा दरम्यान मजुराचा मृत्यू

बीड (रिपोर्टर):- एसटी बसद्वारे सांगलीला निघालेल्या एका 45 वर्षीय मजुराला बसमध्येच हृदयविकाराचा झटका आल्याने चालकाने बस तात्काळ जिल्हा रूग्णालयात नेली. मजुरास उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान या मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रात्री 10.30 वाजता घडली.


ज्ञानेश्‍वर विठ्ठल उचाळ (वय 45 रा.वडीगोद्री जि.जालना) हे सांगली येथे एका शेतकर्‍याकडे सालगडी म्हणून काम करतात. ते काही कामानिमित्त गावाकडे आले होते. रात्री ते सांगलीकडे जाण्यासाठी शेगाव-सांगली या बसमध्ये बसले होते. एसटी बस बीड बसस्थानकात आल्यानंतर त्यांना गाडीतच हृदयविकाराचा झटका आला. सदरील हा प्रकार चालक संदिप गायकवाड व वाहक प्रशांत सुमार यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ बस जिल्हा रूग्णालयात नेली व त्या ठिकाणी ज्ञानेश्‍वर उचाळ यांना दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान उचाळ यांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!