Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगावदुकाने बंद करून व्यापा-यांचे धरणे आंदोलन

दुकाने बंद करून व्यापा-यांचे धरणे आंदोलन

माजलगाव (रिपोर्टर)- शहरातील जुना मोंढा प्रवेश व्दारावरील रोडची झालेली दयनिय अवस्था व नालीचे स्वरूप हेदुरूस्त करून देण्याच्या मागणीसाठी आज दि. 26 ऑक्टोबर रोजी व्यापा-यांनी दोन तास हा भाग बंद ठेवून धरणेआंदोलन केले.
शहरातील जुना मोंढा भागात नालीचे व डबक्याचे पाणी रस्त्यावर येउन रोडची दयनिय अवस्था झाली आहे.त्यामुळे रोगराई व डेंगु सारखे आजार बळावत आहे. या रोडबाबत व्यापारी संघटनेने आंदोलन करून देखिल पालिकाप्रशासन दखल घेत नसल्याने शेतकरी नेते गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली व्यापा-यांनी 26 ऑक्टोबर सकाळी11 वाजण्याच्या सुमारास आप आपली दुकाने व मोंढा बंद ठेवत आंदोलन केले. आंदोलनात गंगाभिषण थावरेयांचेसह व्यापारी सहभागी होते.  

Most Popular

error: Content is protected !!