बीड (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्याने आज सकाळी तहसीलच्या इमारतीवर चढून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. सदरील घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्यास ताब्यात घेतले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे. आज सकाळी संतराम घोडके हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आरक्षणासाठी नगर रोडवरील तहसील कार्यालयाच्या तिसर्या मजल्यावर चढून शासनविरोधात घोषणा देत होते. या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलीस कर्मचार्यांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्यास ताब्यात घेतले.