Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडआता रडायचं नाही लढायचं एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे बेमुदत उपोषण

आता रडायचं नाही लढायचं एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे बेमुदत उपोषण

बीड (रिपोर्टर)- एसटी महामंडळाच्या मागण्यांकडे महामंडळ दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महामंडळ कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याने कर्मचार्‍यांनी रडण्यापेक्षा लढणे पसंत करावे, असे म्हणत कृती समितीच्या वतीने महामंडळाच्या कार्यालयासमोर कर्मचार्‍यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणामध्ये अनेक कर्मचार्‍यांचा सहभाग आहे.
   गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळाचा कर्मचारी अडचणीत असताना राज्य सरकार मात्र कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहत नाही. आर्थिक बाब कर्मचार्‍यांसाठी महत्वाची असून कर्जबाजारीपणाला कंटाळून आतापर्यंत अनेक कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य सरकारचे धोरण चांगले असेल तर नक्कीच एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना न्याय मिळू शकतो. आपल्या न्याय-हक्काच्या मागण्यांसाठी कर्मचार्‍यांनी लढावे, असे म्हणत संयुक्त कृती समितीच्या वतीने विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या वेळी अर्जुन कदम, अशोक गावडे, बबन वडमारे, राहुल बहीर, विजय कुडके, मोहम्मद रियाजसह यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!