Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडधारूरधारुरच्या घाटात पुन्हा टँकर पलटी, अरुंद रस्त्याचा भिजत घोंगडं कधी वाळणार, जागीरमोहा...

धारुरच्या घाटात पुन्हा टँकर पलटी, अरुंद रस्त्याचा भिजत घोंगडं कधी वाळणार, जागीरमोहा घाटातुन जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास

किल्ले धारूर (रिपोर्टर ) धारूरच्या घाटातून अपघाताची मालिका आणखी सुरूच आहे धारूर घाटामध्ये आज सकाळीच तेल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला आहे यामुळे रस्त्यावर सर्वत्र तीन पसरले होते.
यामध्ये चालक व किन्नर  जखमी झाले आहेत यातून अरुंद असलेल्या घाटामुळे अपघाताची मालिका पलटी होण्याची मालिका सुरू असल्याचे दिसून येत आहे घाटात टँकर पलटी झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता यातून वाहनधारकांनी पर्यायी रस्ता म्हणून जहागिर्मोहा घाटातून आपली वाहने नेत आहेत परंतु जहागिर्मोहा घाटातील रस्ता हा अतिशय छोटा असल्याने जीव मुठीत धरून वाहनधारकांना आपले वाहन चालवावे लागत आहे यातून प्रवाशांना देखील आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने मोठी कसरतच करावी लागत आहे.
धारूर घाटातील रस्ता बंद असल्यामुळे दररोज येणार्‍या जाणार्‍या गाड्या जागीरमोहा मार्गे जात असल्याने, हा रस्ता छोटा असल्यामुळे व पावसामुळे काही ठिकाणाचे छोटे छोटे पूलच्या आजूबाजूला रस्ता वाहून गेल्याने वाहन चालकाला जीव हातात घेऊन प्रवास करावा लागत आहे, हा रस्ता छोटा असल्याने भरपूर ट्रॅफिक झालेली आहे, कारखान्याला जाणारे ऊस तोड कामगार, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, शासकीय नोकरदार, छोटे-मोठे व्यापारी, यांना त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे आता ही अपघाताची मालिका कुठेतरी लोकप्रतिनिधींनी थांबवायला हवी हा अरुंद असलेला रस्ता पाठपुरावा करून मोठा करावा जेणेकरून अपघात होणार नाही अशी मागणी सर्व वाहनचालक तसेच प्रवासी वर्गातून होत आहे अपघातस्थळी धारूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी भेट दिली असून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू होता.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!