Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडकेजबीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सुरूच केज तालुक्यात तरुण शेतकर्‍यांने गळफास केला

बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सुरूच केज तालुक्यात तरुण शेतकर्‍यांने गळफास केला

डिसीसी बँकेचं होतं कर्ज
केज (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याचं सत्र सुरूच आहे. तालुक्यातील जवळबण येथील 32 वर्षीय तरुण शेतकर्‍यांने गळफास घेवून आत्महत्या केली. या शेतकर्‍याकडे जिल्हा बँकेचे कर्ज असल्याचे सांगण्यात येते. त्याच बरोबर अतिरिक्त पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी नैराश्यात होता.
बाळासाहेब गोवर्धन घाडगे वय-32 वर्षे या शेतकर्‍याकडे डिसीसी बँकेचं कर्ज होतं. यावर्षी अतिरिक्त पावसामुळे मोठं नुकसान झालं. बँकेचे आणि खाजगी लोकांचे पैसे कसे फेडायचे या चिंतेतून घाडगे यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गफळास घेवून आत्महत्या केली. या घटने प्रकरणी युसूफ वडगांव पोलीसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. दरम्यान शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!